आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना शेतकर्‍यांच्या नावावर राजकारण करायचे आहे

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी; अजित पवार मुंबई: आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना शेतकर्‍यांच्या नावावर राजकारण करायचे आहे असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करणार्‍या आणि गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले. शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे यामध्ये […]

अधिक वाचा..

अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कारांमुळे अधिक समृद्ध

मुंबई: साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ मराठी कादंबरीस ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ काव्यसंग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्यिक, सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. नवीन पिढी […]

अधिक वाचा..

अजिंक्यतारा किल्ल्यातील राजसदर, बुरुज, तटबंदींची दुरुस्ती होणार

मुंबई: मराठा साम्राज्याची राजधानी, ऐतिहासिक शहर साताऱ्यातील संगम माहूलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील काशीविश्वेश्वर, संगमेश्वर, रामेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, पहिले शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे संवर्धन, झुलत्या भग्न पदपुलाच्या नवनिर्माणासह घाटपरिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना, स्वराज्यनिर्मितीसह […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना ‘मुंबई टी २० लीग २०२५’ चे आमंत्रण 

मुंबई: मुंबई टी २० लीग २०२५ ही बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धा ४ जून २०२५ पासून भव्य स्वरूपात सुरू होत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि मुंबई टी२० लीगचे चेअरमन विहंग सरनाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांना या स्पर्धेच्या उद्घाटनाचे आमंत्रण दिले. रोहित शर्माला […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या प्रयत्नांमुळे रायगडच्या रोहा एमआयडीसीत ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगरनंतर आता रायगड जिल्ह्यासाठी 105 कोटी खर्चाचे ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर झाले आहेत. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने केंद्र मंजूरीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले असून टाटा आणि राज्यशासनाच्या सहकार्यातून रोहा एमआयडीसी क्षेत्रात हे नवीन केंद्र उभे राहणार आहे. यामुळे रायगड […]

अधिक वाचा..

‘टाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांच्याच पुढाकारामुळे बीड जिल्ह्यानंतर आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पाठविलेल्या पत्राला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून नांदेड आणि छत्रपती […]

अधिक वाचा..

राज्यास्तरीय बाजार समित्यांचे सक्षमीकरण करताना शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे

मुंबई: राष्ट्रीय नामांकित बाजार अनुषंगाने राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचे हित जपले गेले पाहिजे. बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. बाजार समिती सदस्य जनप्रतिनिधींमधून निवडून येतात. शेतकऱ्यांचे, समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधीत्व करतात. या सदस्यांचे अधिकार कायम ठेवण्यातच शेतकरी व समाजाचे हित आहे. यातूनच बाजार समित्या अधिक कार्यक्षम, बळकट होतील. बाजार समित्यांसदर्भातील निर्णय घेत […]

अधिक वाचा..

वैभवी देशमुख हिच्या बारावी परीक्षेतील यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून 85.33 टक्के गूण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीनं मिळविलेल्या यशानं तिच्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचं सांगून तिच्या यशानं महाराष्ट्राला आनंद झाला […]

अधिक वाचा..

जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अजित पवारांनी घेतला पुढाकार

प्रत्येक नागरीकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता;पर्यटकांना परत आणण्यासाठी अतिरिक्त विमानाची व्यवस्था – अजित पवार मुंबई: पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्यसरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून […]

अधिक वाचा..

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुम्ही प्रवेश केलात मात्र माझ्याकडून कधी भेदभाव होणार नाही 

मुंबई: आपला महाराष्ट्र हा महापुरूषांचा आहे. त्यांच्या विचारांवरच आपल्याला चालायचे आहे असे सांगतानाच मला जे पटते ते काम मी करतो. मी ज्याला शब्द दिला त्याचे काम कधी अपूर्ण ठेवले नाही. आज पक्षात तुम्ही प्रवेश केलात मात्र माझ्याकडून कधी भेदभाव होणार नाही अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिली. आज […]

अधिक वाचा..