शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, एका तीन वर्षीय निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. लग्न करण्याच्या वादातून आरोपीने प्रेयसीच्या मुलालाच संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राणी पप्पु कोल (वय 25) या कारेगाव येथील कल्याणी कंपनीच्या मागे वास्तव्यास असुन त्या मुळच्या मध्यप्रदेश जिल्ह्यातील अनुपपूर येथील रहिवासी आहेत. या प्रकरणातील आरोपी देवांशु आदित्य साहू (वय २०, रा. बरटोला, ता. जि. अनुपपूर, मध्यप्रदेश) याला 18 जून रोजी पहाटे 12:49 वाजता अटक करण्यात आली आहे.
View this post on Instagram
नेमकी घटना काय…?
17 जून 2026 रोजी दुपारी 12:30 ते सायंकाळी 6:00 वाजण्याच्या दरम्यान कारेगाव येथील राहत्या खोलीत ही घटना घडली. फिर्यादी महिला आणि आरोपी यांच्यात ओळख व प्रेमसंबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपी महिलेशी लग्न करण्यासाठी आग्रह धरत होता. मात्र, महिलेचा तीन वर्षांचा मुलगा अंशु तिच्यासोबत राहत असल्याने आणि ती मुलाला त्याच्या वडिलांकडे सोडण्यास तयार नसल्याने दोघांमध्ये वाद सुरु होता.
याच कारणावरुन आरोपी देवांशु साहू संतापला. “तू मुलाला नवऱ्याकडे सोडून येत नाहीस आणि माझ्याशी लग्नही करत नाहीस,” या कारणावरुन त्याने रागाच्या भरात तीन वर्षीय कु. अंशु पप्पु कोल याला मारहाण केली. फिर्यादीनुसार, आरोपीने चिमुकल्या अंशुच्या तोंडावर, ओठांवर, डोळ्यांवर आणि नाकावर कशानेतरी गंभीर मारहाण केली. या अमानुष मारहाणीत निष्पाप बालकाचा मृत्यू झाला. अवघ्या तीन वर्षांच्या मुलाचा अशा क्रूर पद्धतीने जीव घेतल्याने कारेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. वैयक्तिक संबंधातील वादाचा राग एका निष्पाप बालकावर काढल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
रांजणगाव पोलिसांची तत्पर कारवाई…
घटनेची माहिती मिळताच शिरुर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे करत आहेत. आरोपीविरुद्ध खुनाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
लिव्ह इन मुळे लाईफ धोक्यात…
प्रेमसंबंध आणि लग्नाच्या वादातून एका निष्पाप तीन वर्षीय चिमुकल्याचा बळी जाणे ही अत्यंत संतापजनक आणि वेदनादायी घटना आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि रागासाठी एका निरागस जीवाचा अंत करणाऱ्या आरोपीविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कारेगावातील ही घटना समाजातील वाढत्या विकृत मानसिकतेचे भयावह वास्तव अधोरेखित करणारी ठरत आहे.
View this post on Instagram
शिरूर! वरुडे येथील आरोपीचे स्टेटस; लवकरच एकाचा मर्डर करून जेलमध्ये जाणार…
शिरूर तालुक्यातील महिलेचा प्रियकराने संशयावरुन केला खून…
शिरूर तालुक्यात अनोळखी व्यक्तीसोबत अल्पवयीन मुलगी करत होती चॅटिंग…
शिरूर तालुक्यातील युवकाने व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला प्रेयसीचा नग्न फोटो…
शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई