shirur-mseb-police

शिरूर तालुक्यात डीपी चोरीच्या घटना; संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात…

क्राईम

शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विशेष पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकामार्फत रात्रीच्या वेळेत संवेदनशील व दुर्गम भागांमध्ये नियमित गस्त घालण्यात येत आहे.

महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेल्या या संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात केली असून, रोहित्र चोरी होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. रोहित्र चोरीमुळे वीजपुरवठा खंडित होऊन ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो तसेच महावितरणचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

संयुक्त पथकाकडून रात्रीच्या वेळी रोहित्र केंद्रांची पाहणी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच चोरी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनीही रोहित्र परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास त्वरित महावितरण किंवा पोलिस प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाकळी हाजी येथे डाळिंब चोरीचा प्रयत्न फसला; दुचाकीसह तीन चोरटे रंगेहाथ जेरबंद

शिरूर तालुक्यात डीपी चोरीचे प्रमाण वाढले; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण…

पुणे जिल्ह्यात अजब चोरी! मेडिकल फोडून चोरले फक्त कंडोम अन्…

रोहित्र फोडून तांब्याच्या तारांची चोरी; अनोसेवाडी अंधारात

शिरूर तालुक्यात चोरी करताना तीन चोरट्यांना पकडले रंगेहात अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत