आंतरजिल्हा जबरी चोरी टोळीचा पर्दाफाश; तीन सराईत आरोपी जेरबंद, ५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

सासवड (प्रतिनिधी): पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि सासवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून दोन मोटारसायकली, साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात […]

अधिक वाचा..

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीला तीन दिवसांच्या पाठलागानंतर चाकण येथून ताब्यात घेण्यात आले. 8 जुलै 2021 रोजी बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी वाहतूक व साठवणूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 78 लाख […]

अधिक वाचा..

कोल्हापूरात तरुणींवर अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; मुख्य आरोपी अटकेत, साथीदार फरार

सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक पीडितांचा संशय कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ बनवत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी शाहिद समीर सनदे (वय २२) याला अटक केली असून […]

अधिक वाचा..

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवत फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून शुक्ला यांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

सेक्स रॅकेट प्रकरणाने महाराष्ट्र हादरला; अशोक खरात अटकेत, SIT मार्फत सखोल चौकशी सुरू

छत्रपती संभाजीनगर: राज्यात खळबळ उडवणाऱ्या कथित सेक्स रॅकेट आणि लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला २४ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३५ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात […]

अधिक वाचा..

चुलत्याकडून पुतणीवर वारंवार अत्याचार; आरोपी अटकेत, ७ दिवस पोलीस कोठडी

पुणे: लोणी काळभोर परिसरात नातेसंबंधांनाच काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सख्ख्या चुलत्याने पुतणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी २२ वर्षीय पीडितेच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी घरकाम करून आपल्या कुटुंबाचा […]

अधिक वाचा..

पत्नीशी संबंधाच्या संशयातून वेटरची हत्या; पती अटकेत

ठाणे: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका वेटरची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिळ-डायघर पोलिसांनी संशयित पतीला अटक केली असून अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा उलगडा केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिळ-डायघर परिसरातील पिंपरी गाव येथील भातशेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. […]

अधिक वाचा..

औरंगाबादात ‘हायड्रो गांजा’चे जाळे उघड; दोन तरुण अटकेत

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात विदेशी ‘हायड्रो गांजा’ची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गुन्हे शाखेने दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने एन-४ परिसरातील राजवीर चरणसिंग बिरग (२०) आणि ओम रवींद्र शिंदे (२३) यांना मंगळवारी रात्री छावणीतील लोखंडी पुलावर सापळा रचून रंगेहाथ पकडले. राजवीरच्या बॅगेत […]

अधिक वाचा..

भाजप आमदार चंद्रू लमाणी लाच प्रकरणात अटकेत; 5 लाख स्वीकारताना रंगेहात पकडले

कर्नाटक: कर्नाटकातील शिरहट्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार चांद्रू लमाणी यांना कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून अटक केली आहे. ही रक्कम कथित 11 लाख रुपयांच्या एकूण मागणीचा भाग असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सांगितले की, सापळा कारवाईनंतर आमदारांना प्रथम चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर औपचारिक अटक करण्यात आली. या […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; विक्रम पांचाळ ठार, चार आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

लातूर: लातूर शहरात विद्यार्थ्यांमधील वादातून झालेल्या भीषण चाकूहल्ल्यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मृत विद्यार्थ्याचे नाव विक्रम नारायण पांचाळ (वय २१, रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर) असे आहे. दुचाकीच्या नुकसानीच्या भरपाईच्या कारणावरून सोमवारी […]

अधिक वाचा..