रांजणगाव पोलिसांनी खुन झालेल्या मयताची ओळख पटवत 12 तासाच्या आत आरोपीना ठोकल्या बेड्या

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील एक्सप्रो इंडीया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसेच डंकन कंपनीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजुला असलेल्या मोकळ्या माळरानामध्ये एका 25 ते 30 वयोगटातील अनोळखी पुरुषाचा डोक्यात दगड घालून खुन करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुरुवार (दि.01) रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या सरपंचांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा

सरपंच रमेश गडदे यांच्यावरील हल्ल्याचा सभेतून निषेध शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सरपंच रमेश गडदे यांच्यावर चार दिवसांपूर्वी गावातील काही युवकांनी हल्ला करत मारहाण केली असल्याने गावातील आम्ही शिक्रापूरकर ग्रुपच्या युवकांनी नुकतेच निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करुन त्यांच्यावर कठोर शासन करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन देण्यात आले. […]

अधिक वाचा..

सणसवाडीत चोरी करुन चार महिन्यांपासून फरार आरोपी अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील चौकातून चार महिन्यांपूर्वी 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरुन फरार झालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. सणसवाडी ता. शिरुर येथे बलेंदर यादव यांचे पानाचे दुकान असून २४ जुलै २०२२ रोजी सकाळच्या […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांना गुंगारा देणारा माजी उपसरपंच जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे मित्राची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर शिरुर तालुक्यातील वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी हा शिक्रापूर पोलिसांना तब्बल सहा महिने गुंगारा देत होता मात्र शिक्रापूर पोलिसांनी माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी यास अटक केली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाळासाहेब लांडे यांचा […]

अधिक वाचा..

जितेंद्र आव्हाडांवर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई…

मुंबई: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई करण्यात आली असून जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. कळवा – मुंब्रा उड्डाण पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर श्रेयवादाची टिका केली होती त्यातूनच ही कारवाई झाली आहे असेही महेश तपासे म्हणाले. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील जांबुत येथील तिसरा बिबट्या जेरबंद

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील जांबुत येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी ( दि.) रोजी पहाटे बिबट्या जेरबंद झाला. हल्ल्याच्या घटनांनंतर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात नर संवर्गातील सहा ते सात वर्षे वयोमान असणारा तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागला यश आले आहे. शिरुर तालुक्यातील जांबुत येथील जोरी मळा येथे सुदाम जोरी यांच्या वस्तीवर वनविभागाने सावज असलेला पिंजरा लावला […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात पहाटे चोरी करणाऱ्यास युवकाने रंगेहात पकडले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कॉलनी मध्ये घराच्या बाहेरील धान्याचे पोते चोरून घेऊन जाणाऱ्यास सदर ठिकाणच्या नागरिकांनी शिताफीने पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले असून भूपेंद्र मुन्ना ठाकूर असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंद्रप्रस्थ कॉलनी येथील लालासाहेब मोरे हे घरात झोपलेले असताना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कुत्रे भुंकण्याचा […]

अधिक वाचा..

जांबुत मध्ये एक बिबट्या अखेर जेरबंद

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरुर) येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सचिन जोरी आणि पूजा नरवडे यांच्या घटनेनंतर वनविभाग प्रशासनान मात्र खडबडून जागे झाले. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची मोठी फौज या भागात ठाण मांडून होती. यावेळी शनिवार (दि.२२) रोजी पहाटे मादी संवर्गातील 7 ते 8 वर्षे वयोमान असणाऱ्या बिबट्याला जेरबंद […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त नोकरीच्या नावाखाली पैसे लुबाडणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल; एकास अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील कंपनीमध्ये सिक्युरीटीची नोकरी लावतो असे सांगत एक युवक आणि त्याच्या जवळच्या नातेवाईक मुलीकडुन पैसे घेऊन नोकरी न लावता दहा हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी साहिल सुभाष मुढाई याने फिर्याद दाखल केल्याने सागर सुरेश शेलार रा. विसापुर, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर आणि प्रविण बाप्पु गजाळे रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर […]

अधिक वाचा..

तोतया पोलीस निरीक्षक म्हणून खेड पोलीस ठाण्यात रुबाब करणाऱ्यास अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): खेड तालुक्यात मी पोलीस निरीक्षक असुन माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे फोनवरुन सांगुन पोलिसात तक्रार दाखल असलेल्या तक्रारदाराला मदत करतो, त्याचा मोबदला द्यावा लागेल, असे म्हणणाऱ्या व त्याबाबत चौकशी करणाऱ्या पोलिसांवर रुबाब करणाऱ्या तोतया पोलीस निरीक्षकाला खेड पोलिसांनी गजाआड केल्याची खळबळजनक घटना खेड पोलीस ठाण्यात घडली असून संदिपराजे गणतराव निंबाळकर असे अटक […]

अधिक वाचा..