पुणे नगर महामार्गावर धुमाकूळ घालणारे अखेर जेरबंद

मुख्य बातम्या

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कोरेगाव भीमात कामगिरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे नगर महामार्गावर मागील आठवड्यात काही चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास नागरिकांना मारहाण करत लुटमार करत धुमाकूळ घातल्याची घटना घडली असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करत यातील 2 चोरट्यांना कोरेगाव भीमा येथून जेरबंद केले असून अनिल अंकुश काळे व सागर रामतीर्थ गौतम असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मध्ये 7 डिसेंबर रोजी कोरेगाव भीमा येथील फारुक खान हे त्यांच्या भंगाराचे दुकानात झोपलेले असताना खी चोरटे आले त्यांनी खान यांना मारहाण करत त्यांच्या जवळील 10 हजार रुपये काढून नेले होते. त्याचवेळी शेजारील सोसायटी मधून एक दुचाकीची चोरी करत सणसवाडी जवळील एल अँड टी फाटा येथे आशिष सिंह या युवकाला दगडाने बेदम मारहाण करुन त्याच्या जवळील 500 रुपये बळजबरीने काढून नेले. मात्र यावेळी शिक्रापूर पोलिसांनी त्या चोरट्यांचा पाठलाग केला असा सर्वजण पळून गेले.

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह शिक्रापूर पोलिसांनी पुणे नगर महामार्गावरील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले सदरचा गुन्हा हा आंतरजिल्हा टोळीने केला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर काही चोरटे चोरीचा माल विक्री करण्यासाठी कोरेगाव भीमा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व शिक्रापुरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, सचिन काळे, गणेश जगदाळे, काशिनाथ राजापूरे, मुकुंद कदम, अक्षय सुपे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, हनुमंत पासलकर, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार राजू मोमीन, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, अजय घुले, स्वप्निल आहीवळे, रामदास बाबर, पोलीस नाईक तुषार भोईटे, अमोल शेडगे यांनी कोरेगाव भीमा येथे सापळा रचून अनिल अंकुश काळे (वय २०) रा. खंडाळा ता. खंडाळा जि. सातारा व सागर रामतीर्थ गौतम (वय 23) रा. भिमानगर ता. म्हाडा जि. सोलापूर यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील बॅग मधील काही मोबाईल व दुचाकी जप्त केले.

दरम्यान दोघां कडे चौकशी केली असता त्यांनी 7 डिसेंबर रोजी पुणे नगर महामार्गावर तब्बल 9 ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांच्या सोबत 3 अल्पवयीन साथीदार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सध्या दोघांना शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार हे करत आहे.