लग्न अवघ्या 11 दिवसांवर असताना तरुणाची गोळी झाडून हत्या…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरतल्या बायजीपुऱ्यामध्ये लग्न अवघ्या ११ दिवसांवर असलेल्या तरुणाचा पैशांच्या किरकोळ वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अल कुतूब हसीब हमद या ३० वर्षीय तरुणाचा खून झालेल्या तरुणाचे नाव तर हल्लेखोराचे नाव फयाज पटेल असल्याचं समजते. बुधवार (दि. 9) रोजी सायंकाळी ७: ३०च्या सुमारास न्यू बायजीपुऱ्यातील इंदिरानगरमध्ये त्याच्यावर गोळीबार […]

अधिक वाचा..

भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू; नाना पटोले

मुंबई: राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत, त्यापाठीमागे भाजपाचा हात आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांच्यावर कारवाई करत खासदारकी रद्द केली व त्यांना बेघर करण्यात आले. जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात मौन सत्याग्रह आंदोलन करण्यात […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांचे निधन

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील दत्तात्रय खंडू जाधव (वय 49) हे रांजणगाव गणपती येथील बसस्थानकाकडुन मंदिराकडे पायी चालत येत असताना त्यांना पाठीमागून टेम्पोने धडक दिली होती. त्यानंतर त्यांना शिरुर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. रांजणगाव गणपती येथील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात दत्तात्रय जाधव यांचे मोलाचे योगदान […]

अधिक वाचा..

पालकांनी मुलांना मोबाईल व दुचाकीपासून लांब ठेवावे

शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांचे प्रतिपादन शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय जीवनात शालेय मुलांनी शाळाबाह्य मुलांपासून लांब रहावे तर पालकांनी देखील शालेय मुलांना मोबाईल व दुचाकी पासून लांब ठेवावे असे प्रतिपादन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला येथे शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई: ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे (वय ९६) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. अंबर कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपण अत्यंत […]

अधिक वाचा..

प्राथमिक शिक्षक राहुल थोरात यांचे उपचारादरम्यान निधन

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील आमदाबाद येथील काही दिवसांपुर्वी अपघातात निधन झालेले घोडगंगा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन व प्रसिद्ध व वकील कै. रंगनाथ भागाजी थोरात यांचे थोरले चिरंजीव कै. राहुल रंगनाथ थोरात, प्राथमिक शिक्षक, (वय 37) यांचे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुःखद असं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आमदाबाद परीसरामध्ये शोककळा पसरली असून थोरात परीवारातील अल्पावधीमध्ये दोन […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांची आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ…?

शिरुर (तेजस फडके): एका पोटगीच्या दाव्यात सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये पोटगी थकल्याने शिरुर न्यायालयाने पतीला अटक वारंट काढत रांजणगाव MIDC पोलिसांना त्याला अटक करण्याचे आदेश दिले होते. याबाबत ‘त्या’ पीडितेने पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांची भेट घेतली होती. परंतु त्या आरोपीला अटक करुन कोर्टात हजर करण्याऐवजी सहायक फौजदार गुलाब येळे यांनी त्याला अटक […]

अधिक वाचा..

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारने गरिबांच्या तोंडचा घास हिरावला

मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गरिबांना अतिरिक्त ५ किलो अन्नधान्य पुरवणारी प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजना मोदी सरकारने बंद केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ८१ कोटी गरिबांना महिन्याला १० किलो धान्य मिळत होते परंतु आता फक्त ५ किलोच मिळणार आहे. मोदी सरकारने […]

अधिक वाचा..

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांच्या निधन

संभाजीनगर: मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचे निधन झाले आहे. शेतकरी कष्टकऱ्यांच्या विकासासाठी वेळोवेळी आग्रही भूमिका घेणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनाने मराठवाडा पोरका झाला असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी यांनी व्यक्त करत भाई यांना श्रद्धांजली वाहिली. या दुःखद […]

अधिक वाचा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन

नागपूर: “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो. आम्ही सर्व मा. पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. स्वर्गीय हिराबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी […]

अधिक वाचा..