Shirur Police Station

शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; दातच पाडले…

पाबळ (सुनिल जिते) :  शेतात घुसलेली जनावरे बाजूला घेऊन बांधण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका ८० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे घडली आहे. या मारहाणीत वृद्धाचा एक दात पडला असून तीन दात निकामी झाले आहेत. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दुचाकी चोरीचे वाढले प्रमाण…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहर व तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून अवघ्या महिनाभरात चार दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी दोन घटना शिरूर शहरातील ढोरआळी परिसरात तर एक घटना कवठे येमाई येथे घडली आहे. सतत घडणाऱ्या या चोरींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-electricity

रांजणगाव MIDC मध्ये विजेच्या धक्क्याची गंभीर घटना; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा जीव धोक्यात…?

कारेगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या विद्युत दुरुस्तीच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून, विजेच्या खांबावर चढून काम करणाऱ्या कामगाराला अचानक विजेचा धक्का बसल्याने त्याचा हात गंभीररीत्या भाजल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा जीव धोक्यात आल्याची चर्चा औद्योगिक परिसरात रंगली आहे. खात्रीलायक सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..
pvc-drugs

नशेचा नवा ट्रेंड! शिरूर तालुक्यात पाईप चिकटविण्याच्या लिक्विडचा नशेसाठी वापर…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात ‘एमडी’ ड्रग, गांजा आणि इतर अमली पदार्थांनी आधीच तरुणाईला विळखा घातलेला असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरगुती, बांधकाम आणि शेतीच्या कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या पीव्हीसी पाईप चिकटविण्याच्या केमिकलयुक्त लिक्विडचा काही युवकांकडून थेट नशेसाठी वापर केला जात असल्याची गंभीर माहिती समोर आली असून, ग्रामीण भागात “स्वस्त नशेचे” […]

अधिक वाचा..
bride

वाघोलीत लग्नसमारंभादरम्यान नवरीसोबतच झालं मोठं कांड…

शिरूर : वाघोलीतील एका प्रसिद्ध बँक्वेट हॉलमध्ये १४ मे रोजी अक्षता पडण्याची वेळ जवळ येत असल्याने नवरी मुलगी मेकअप रूममध्ये लग्नासाठी तयार होत होती. अक्षता पडल्या, विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. पण, ऐन लग्नाच्या दिवशी गर्दीचा फायदा उठवून तीन संशयित महिलांनी नवरीच्याच खोलीत शिरून एक भयंकर कांड घडवून आणले होते. ज्यामुळे नवरीच्या आनंदाचे रूपांतर क्षणात […]

अधिक वाचा..
dead

Video: पाबळ-कान्हूर मेसाई रस्त्यावर विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू…

शिरूर (तेजस फडके): पाबळ (ता. शिरूर) येथील कान्हूर मेसाई रस्त्यावर सोमवारी (ता. १८) सकाळच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. संबंधित घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. भास्कर शिवलाल मकवाणे (वय ६०, रा. पाबळ) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. आशा बाळू घोलप (रा. घोलपवाडी, कान्हूर मेसाई), दुचाकीस्वार […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये ‘सोन्याच्या मोडी’च्या नावाखाली तब्बल १ कोटींची फसवणूक…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात काळ्या पैशांच्या आणि बोगस सोन्या व्यवहारांच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, “सोन्याची मोड देतो” असे आमिष दाखवत पुण्यातील सराफ व्यावसायिकाची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणुक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या पाच मिनिटांच्या व्यवहारात आरोपीने 84 लाख 65 हजार रुपयांचा अपहार केल्याने व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती शेड फोडून लाखो रुपयांच्या कॉपर वायर लंपास…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर रिपेरिंगच्या शेडमधून तब्बल २ लाख ४७ हजार रुपयांचा कॉपर वायरचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी एकनाथ रमेश शेलार (वय ४२) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दिलेल्या […]

अधिक वाचा..
Crime

Video: शिरूर तालुक्यात अवैध हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत…

शिरूर (तेजस फडके) : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शिरूर तालुक्यात मोठी धडक कारवाई करत निमगाव दुडे परिसरातील अवैध गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. घोडनदीच्या काठावरील झाडाझुडपांमध्ये सुरु असलेल्या या बेकायदा दारु निर्मिती केंद्रावर छापा टाकत पोलिसांनी तब्बल २४ हजार लिटर कच्चे रसायन, तयार गावठी दारु आणि दारु निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

शिरूर तालुक्यात पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग; गोळीबाराची घटना…

शिरूर (तेजस फडके) : पुण्यातील चऱ्होली भागात १३ मे रोजी घडलेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत असताना शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात शुक्रवारी सायंकाळी पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग व कथित गोळीबाराची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. अष्टविनायक रोड, पिंपरी दुमाला, वाघाळे आणि सोनेसांगवी परिसरात मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सर्च […]

अधिक वाचा..