Shirur Police Station

शिरुर तालुक्यातील महिलेला चोराचा चेहरा पाहून बसला धक्का; लाखोंचे दागिने हस्तगत…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चांडोह येथे एका महिलेनं चोरांच्या भीतीनं आपले दागिने किचनमध्ये ठेवले होते. मात्र, डब्यात सुरक्षित ठेवलेले सोन्याचे दागिने गायब झाल्याने महिलेनं पोलिसांकडे धाव घेतली. पण, शिरूर पोलिसांनी अवघ्या १४ तासांत या चोरीचा छडा लावला. मात्र जेव्हा खरा चोर समोर आला, तेव्हा स्वतःच्या मुलाला पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी आरोपी मुलाला […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात अजब चोरी! मेडिकल फोडून चोरले फक्त कंडोम अन्…

पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकणमधील खराबवाडी परिसरात असलेल्या एका मेडिकलमध्ये झालेल्या चोरीची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. चोरांनी चक्क मेडिकल फोडलं आणि पैसे चोरण्याऐवजी कंडोम, झंडू बाम आणि चॉकलेटवर डल्ला मारला आहे. मात्र, या चोरीची चर्चा आता संपूर्ण राज्यभरात होत आहे, कारण चोरट्यांनी दुकानातील महागड्या औषधांना हातही न लावता चक्क कंडोम, कॅटबरी आणि झंडू बामचे बॉक्स […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी; लाखो रुपयांचे दागिने लंपास…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल ७ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या गावातील शेतकरी कुटुंबाला या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनामगाव येथील ज्ञानेश्वर […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

Video! रांजणगाव MIDC दहशतीत! कामगारांवर हल्ले आणि लूटमारीचे वाढले प्रमाण…

रांजणगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरात परप्रांतीय कामगारांवर हल्ले, लूटमार आणि अमानुष मारहाणीच्या घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत असून, “कामगार सुरक्षित तर उद्योग सुरक्षित” हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.   View this post on Instagram   A post shared […]

अधिक वाचा..
karegaon-drugs

रांजणगाव परिसरात ‘ड्रग्ज मुक्त गाव’ मोहिमेला वेग; कारेगाव येथे जनजागृती कार्यक्रम…

रांजणगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीत कारेगाव येथील श्री कारेश्वर मंदिर सभागृहात आज सकाळी 10.30 ते 12.00 या वेळेत ‘ड्रग्ज मुक्त गाव’ या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक महादेव वागमोडे यांनी केले. यावेळी ग्रामस्थांना अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन सुरू होते. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल हे शिरूर मध्ये आले होते. त्यांना अवैध धंद्यांची माहिती कळतात त्यांनी कठोर भूमिका घेत शिरूर पोलीस ठाणे, रांजणगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना शिरूर पोलीस ठाणे […]

अधिक वाचा..

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील ‘रविनंदा कॉयलाईट’ सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून रचयिता अभिषेक गुप्ता (वय ३७) या उच्चशिक्षित विवाहितेने १६ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रचयिता या व्यवसायाने संगणक अभियंता होत्या. मात्र, गेल्या काही काळापासून सासरच्या मंडळींकडून त्यांच्याकडे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिस ठाण्यासमोरच दोन गटात दगडफेक, हाणामारी, ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिस ठाण्याच्या आवारातच सोमवारी (ता. १३) मध्यरात्री गोंधळ, दगडफेक आणि मारामारीची घटना घडल्यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिस स्टेशनच्या आवारातच दोन गट आमनेसामने येत एकमेकांवर हल्ले करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच ठाणे अमंलदार कक्षातीत काही वस्तुंची तोडफोड झाल्याची माहीती […]

अधिक वाचा..
shirur-tehsil-office

शिरूरमध्ये गुन्हेगारीचा सुळसुळाट; निलेश वाळुंज यांचा १५ एप्रिलपासून बेमुदत सत्याग्रह…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. विशेषतः शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आशीर्वादाने […]

अधिक वाचा..
sanjay-travel-bus-fire

शिरूर! पुणे-नगरमहामार्गावर कारला धक्का लागल्याने कंटेनरच पेटवला…

शिरूर : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील ‘जीत ढाब्या’समोर कारला कंटेनरचा धक्का लागल्याच्या रागातून कारमधील दोघांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण करत दोघांनी मालाने भरलेला कंटेनर पेटवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंटेनर चालक अंकुश मस्तराम शर्मा (वय ३३, रा. जम्मू-काश्मीर) हे ३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अहिल्यानगरकडून […]

अधिक वाचा..