crime

शिरुर तालुक्यात दरोडा; वृद्ध महिलांना मारहाण करुन १ लाख ६४ हजारांचे दागिने लंपास

शिंदोडी (तेजस फडके) आंबळे (ता. शिरुर) येथे दि (६ जुलै) रोजी रात्री १ च्या सुमारास सहा अनोळखी इसमांनी एका घरात घुसून दोन वृद्ध महिलांना मारहाण करत जबरदस्तीने सोन्याचे दागिने व चांदीची जोडवी असा एकूण १ लाख ६४ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करत दरोडा टाकला आहे. या प्रकरणी कल्पना प्रताप निंबाळकर (वय ६०, रा. आंबळे, […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर; गंभीर गुन्ह्यातील माजी पंचायत समिती सदस्याला अटक करण्यासाठी शिरुर पोलिसांना सापडेना मुहूर्त…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असुन कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. वीस दिवसा पुर्वी शिरुर तालुक्यातील एका माजी पंचायत समिती सदस्यासह सहा जणांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली होती. याबाबत शिरुर पोलीस स्टेशनला सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील तीन आरोपीना शिरुर न्यायालयाने सात दिवस पोलीस […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

रांजणगाव जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांचा तपास हास्यापद तर तपासी अधिकाऱ्यांची भुमिका संशयास्पद…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती ग्रामपंचायत हद्दीतील ७२ गुंठे जमीन अपहारप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला तत्कालीन ग्रामसेवक व लिपिकाला पोलिसांनी अटक केलेली आहे. तपासा दरम्यान उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न करुन त्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. रांजणगाव पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवक हनुमंत लक्ष्मण चव्हाण यांनी तपासा दरम्यान दत्तात्रय पाचुंदकर […]

अधिक वाचा..

रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ठेकेदारांकडुन कामगारांची होतेय आर्थिक फसवणुक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला लावण्याच आमिष दाखवत परप्रांतीय तसेच विदर्भ, मराठवाडा येथील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींची आर्थिक फसवणुक होत आहे. अशी अनेक प्रकरणे सध्या ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ कडे येत आहेत. शिरुर तालुक्यात रांजणगाव MIDC मध्ये अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील छेडछाड प्रकरणी डायल ११२ ला कॉल पण शिक्षकावर कारवाई कधी…?

शिक्रापुर (तेजस फडके) शिरुरच्या पश्चिम भागातील न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावरुन जवळच असणाऱ्या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या अंदाजे ४५ वर्षीय शिक्षकाने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका आदिवासी समाजातील महिलेची छेड काढली. त्यानंतर सदर ठिकाणावरुन गावातील एका राजकीय पदाधिकारी महिलेने ११२ ला कॉल करुन घडलेला सर्व प्रकार सांगितला. परंतु या शिक्षकाला राजकीय वरदहस्त असल्यामुळे […]

अधिक वाचा..

घोड धरणात वाळूचोरी… ११२ ला कॉल अन तब्बल तीन तासात तत्परता दाखवत पोलिस हजर

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणात गेल्या दोन वर्षांपासुन बेकायदेशीररीत्या वाळू उपसा चालु असुन महसूल आणि पोलिस विभाग जाणीवपुर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. यांत्रिक बोटीच्या साह्याने घोड धरणातुन बेकायदेशीररीत्या वाळू उपसा चालु असल्याबाबत एका जागरुक युवकाने डायल ११२ ला कॉल केला. पण शिरुर पोलिस मात्र तब्बल तीन तासानंतर तत्परता दाखवत घटनास्थळी हजर झाले. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील एका शिक्षकाचा प्रताप; आदिवासी महिलेची केली छेडछाड

शिक्रापुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना शिरुरच्या पश्चिम भागातील एका गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या एका अंदाजे ४५ वर्षीय शिक्षकाने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका आदिवासी समाज्यातील महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खात्रीलायक सूत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार हा शिक्षक काही खाजगी कामानिमित्त पिडीत महिलेच्या घरी गेला […]

अधिक वाचा..

संतापजनक; नात्याला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना; बापाचा स्वतःच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर लैंगिक आत्याचाराच्या घटना वाढत असुन तुळजापूर येथुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आलेल्या ४० वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असुन त्यानंतर हि गोष्ट कोणाला सांगू नये यासाठी त्या नराधमाने पत्नी आणि मुलीला जिवे मारण्याचीही धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जेवणाच्या बिलावरुन तरुणावर लोखंडी खुर्चीने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) ढोकसांगवी (ता. शिरुर) येथे जेवणाचे बिल न दिल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातुन दोघा तरुणांनी एकास शिवीगाळ व मारहाण करुन लोखंडी खुर्ची डोक्यात मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ढोकसांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी करण चंद्रकांत वाळुंज (वय २४) रा. पाचंगेवस्ती, ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. […]

अधिक वाचा..

उल्लेखनीय; महिलांचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या एका अट्टल चोराला अटक १० लाखांचे सोने हस्तगत

कारेगाव (तेजस फडके) दुकानात जाऊन पाण्याची बाटली घेण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावणाऱ्या एका अट्टल चोरट्याला अटक करुन स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तब्बल १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चोरांकडून एकूण ८ जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील पिंपरी दुमाला येथील […]

अधिक वाचा..