मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करा,मगच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या; सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी

मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना भेटून केली मागणी मुंबई: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला होता. याच चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर निवडणुका पारदर्शक होणार नाही. त्यामुळे सदोष मतदार याद्यांची तपासणी करून त्या दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच स्थानिक स्वराज्य […]

अधिक वाचा..

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत तातडीने द्या मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भाजपा महायुतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांना अद्याप कसलीच मदत मिळालेली नाही. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, सरसकट कर्ज माफ करावे, वीज बिलाची थकबाकी माफ करावी […]

अधिक वाचा..

पंकजा मुंडे यांच्या कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत श्वेतपत्रिका काढण्याच्या मागणीवर सरकारने काय कारवाई केली

मुंबई: राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ओबीसी उपसमितीच्या सदस्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी समितीच्या पहिल्याच बैठकीत आतापर्यंत मराठा समाजाला जे कुणबी, मराठा कुणबी,कुणबी मराठा दाखले दिले त्याची श्वेतपत्रिका काढण्याबाबत समितीचे एकमत झाल्याची भूमिका मांडली आहे. याबाबत सरकारने काय कारवाई केली अशी विचारणा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली आहे. राज्याचे इतर मागासवर्गीय व बहुजन […]

अधिक वाचा..

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी; पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई: बाजारात कांद्याचे दर टिकून राहावे व त्याचा फायदा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देऊन निर्यात अनुदान दुप्पट करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. कांद्याच्या दरासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. […]

अधिक वाचा..

टाकळी हाजीतील आरोग्य अधिकाऱ्यांची सेवा ‘रामभरोसे’;  ग्रामस्थांकडून बेजबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कामात दिरंगाई व कर्तव्यात हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांमधून होत असून आधिकारी निवासी राहत नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात अधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची वरीष्ठ अधिकार्यांनी […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीतील जुगारांचे अड्डे बंद करण्याची मागणी

शिरुर (तेजस फडके) कोरेगाव भिमा, तळेगाव ढमढेरे, शिक्रापुर हद्दीत अंदाजे ६ जुगारांचे अड्डे चालु असुन हे जुगार अड्डे कायमचे बंद करण्यात यावेत अशी मागणी भाजपाचे आंबेगाव-शिरुरचे माजी तालुकाध्यक्ष सतिश पाचंगे यांनी केली आहे. आठ दिवसांपुर्वीच शिक्रापुर येथील एका लॉजवर चाललेल्या अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई करण्यात आली होती. शिक्रापुर हद्दीत जुगार, मटका, गावठी दारु, खर्रा अश्या […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषदेत सातत्याने गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

भूमिपुत्र प्रतिष्ठानचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेच्या कार्यालयीन वेळेत सातत्याने गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात भूमिपुत्र प्रतिष्ठानतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, अशा अधिकाऱ्यांची हजेरी व हालचाल रजिस्टरची तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्त यांना सादर करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी 

पाबळ (सुनिल जिते): गेली एक-दीड महिन्यापासून कान्हूर मेसाई (ता. शिरूर) परिसरात शेतात बिबट्याचा वावर आहे. यामुळे वनखात्याने ही बाब गांभीर्याने घेऊन या परिसरात पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कान्हूर व मिडगुलवाडी गावाच्या शिवेच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. काही शेतकऱ्यांना बाजरी तसेच मक्याच्या शेतात शुक्रवारी(ता.०१) बिबट्या […]

अधिक वाचा..

भाजपमध्ये प्रवेश करताच पहिल्याच दिवशी बड्या नेत्याची मागणी

मुंबई: काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी गोरंट्याल यांनी मोठी मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी नेमकं काय म्हंटले. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर बोलताना कैलास […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये नाभिक समाजाचे प्रतीकात्मक मुंडन आंदोलन; दशक्रिया घाटावर सोयी-सुविधांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील दशक्रिया विधी घाट येथे नाभिक समाजासाठी केस कर्तन व मुंडन विधी दरम्यान आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता शिरूर तहसिल कार्यालयासमोर प्रतीकात्मक मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे. ही माहिती शिरूर शहर नाभिक संघटनेचे माजी शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते […]

अधिक वाचा..