बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाक्याच्या देवीसमोर साकडे घातले. दुष्काळाच्या संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, तसेच केंद्र सरकारकडूनही भरीव मदत मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नवरात्रोत्सव मंडळांनी उत्सवातील काही बचत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या […]

अधिक वाचा..

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याचे जगभरातून कौतुक होत असताना, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल व्यक्त केलेला आदर ही भारतासाठी अभिमानाची बाब असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. कॅप्टन मच्छार यांनी गंभीर जखमी अवस्थेतही प्रसंगावधान राखत कॉकपिटचे दार उघडले. त्यामुळे विमानातील इतरांना […]

अधिक वाचा..

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकरी कुटुंबांमध्ये मुला-मुलींची लग्न ठरली आहेत, त्यांच्या विवाहासाठी शिवसेनेच्या माध्यमातून शक्य ती मदत केली जाणार आहे. शिंदे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या संकटामुळे शेतकरी कुटुंबांसमोर मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च […]

अधिक वाचा..

‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’; एकनाथ शिंदे

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; तूर, सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान अकोला: कमी पर्जन्यमान आणि पावसातील प्रदीर्घ खंडामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी बाळापूर तालुक्यातील धधम आणि व्याळा गावांना भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी केली. ‘शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; भरघोस […]

अधिक वाचा..

राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवेला मोठी चालना; १,७५६ नवीन १०८ रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार; एकनाथ शिंदेंक

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत नवीन १,७५६ रुग्णवाहिका शासकीय सेवेत दाखल होणार असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५० रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या रुग्णवाहिकांची पाहणी करून त्यातील अत्याधुनिक सुविधांची माहिती घेतली. तसेच रुग्णवाहिका लवकरात लवकर सेवेत दाखल करण्याची प्रक्रिया निश्चित करण्याचे निर्देश दिले. या प्रकल्पात […]

अधिक वाचा..

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत परतले. पहाटे तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि समर्थकांनी मोठी गर्दी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लंडनच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा झालेला गौरव आणि मुंबईत शिवसैनिकांनी केलेला जल्लोष, यामुळे शिंदे यांच्या […]

अधिक वाचा..

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणाची सुरुवात शिंदे यांनी ‘नमस्कार-जय महाराष्ट्र’ अशी मराठीतून केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल, सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजना आणि भारत-ब्रिटन संबंधांवर भाष्य केले. […]

अधिक वाचा..

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन होताच स्थानिक मराठी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ तसेच ‘लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाचा विजय असो’ अशा घोषणांनी हिथ्रो विमानतळ परिसर दणाणून गेला. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या […]

अधिक वाचा..

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेत ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये एकनाथ शिंदे यांचा तीन पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे आज लंडनला रवाना झाले. ब्रिटिश संसदेतील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप […]

अधिक वाचा..

गणेशोत्सव केवळ आरास-रोषणाईपुरता नको; समाजप्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे; एकनाथ शिंदे

ठाणे : गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. हाच धर्मवीर आनंद दिघे यांचा गणेश दर्शन स्पर्धेमागील उद्देश होता. कार्यकर्त्यांनी गेल्या ३७ वर्षांपासून ही परंपरा सातत्याने जपली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे गणेश दर्शन स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. राम […]

अधिक वाचा..