महापालिका निवडणुकांत महायुतीचा धडाकेबाज विजय; महापौरपदावरून राजकीय हालचालींना वेग

मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, भारतीय जनता पार्टी (भाजप) हा स्पष्टपणे सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने अनेक महापालिकांमध्ये एकहाती सत्ता मिळवली असून, महायुतीने (भाजप–शिवसेना शिंदे गट–राष्ट्रवादी अजित पवार गट) २५ हून अधिक महापालिकांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निकालांतून जनतेने भाजप व महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्याचे चित्र दिसून येते. […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर

मुंबई: राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. या निवडणुकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची धुरा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांकडे सोपवण्यात आली असून, सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार प्रचार केला जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड केल्या असून, मतदारांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास ढासळत चालल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शहरांमधील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासीनतेचे नव्हे, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरील अविश्वासाचे द्योतक असल्याचे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा परिषद व […]

अधिक वाचा..

कारेगाव ग्रामपंचायतीत सत्तेचा ‘सावळा गोंधळ’ सरपंच पदाचा वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिघळला

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील ‘सरपंच’ पदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ठरलेल्या वेळेत राजीनामा न दिल्याने ग्रामपंचायत सदस्यांसह थेट ग्रामस्थांनाच बैठक बोलावण्याची नामुष्की ओढवली आहे. सरपंच-उपसरपंच पद कोणाला द्यायचे, किती कालावधीसाठी द्यायचे, राजीनामा घ्यायचा की नाही—या सर्व प्रश्नांची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात आहेत, हा प्रश्न आता कारेगावकरांना पडला आहे. देवाच्या शपथा…पण त्या पाळल्याचं […]

अधिक वाचा..

पुणे महापालिकेत भाजपचा एकतर्फी झंझावात; ११० जागांवर आघाडी

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत शहराच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजप ११० जागांवर आघाडीवर असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मिळून केवळ १७ जागांपर्यंत मजल मारता आली आहे. काँग्रेसने १२ जागांवर आघाडी घेतली असली तरी ठाकरे गटाची शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना या दोन्ही पक्षांना खातेही उघडता आलेले नाही. मनसेलाही एकही जागा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुका! ‘पॅनेल पद्धती’बाबत मतदारांच्या सर्व शंका दूर

मुंबई: महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून गुरुवार, १५ जानेवारी रोजी राज्यभर मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी सर्व राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाकडून मतदारांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यंदाच्या महापालिका निवडणुका ‘पॅनेल पद्धतीने’ होत असल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. […]

अधिक वाचा..

महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा

मुंबई: भारतीय जनता पक्ष व असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष हे धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राजकीय स्वार्थ साधत आहेत. हिंदु मुस्लीम, मराठा-ओबीसी वाद निर्माण करून जनतेची माथी भडकवतात आणि सत्तेसाठी मात्र एकत्र येतात. हिरव्या पतंगाचा मांजा भगवा आहे तर धनुष्याचा बाण हिरवा आहे. या ढोंगी भाजपा, शिंदेसेना व एमआयएमला महानगरपालिका निवडणुकीत धडा शिकवा व काँग्रेसला […]

अधिक वाचा..

आगामी महानगरपालिका निवडणुकीत तुम्हाला चार वेळा मतदान करावं लागेल; पण नेमकं कसे? जाणून घ्या…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदान प्रक्रियेत यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत निवडणूक होत असून, त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मतदान करणे बंधनकारक असणार आहे. मतदान कधी होणार १५ जानेवारी २०२६ रोजी एकूण २९ प्रभाग ११५ नगरसेवकांची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धत म्हणजे काय प्रत्येक प्रभागातून ४ नगरसेवक निवडले […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा पुणे महापालिका निवडणुकीत जोरदार प्रचार शुभारंभ

महापौर निवडीत शिवसेनेची भूमिका निर्णायक; उद्योगमंत्री उदय सामंतांचा विश्वास पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर उतरली असून, शिवसेना प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, नवसाला पावणारा श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्या चरणी प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आला. सर्वांच्या वतीने आरती करून व जैन मंदिर येथे दर्शन घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) आणि ब्लॅक पँथर या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांची परंपरा जपणाऱ्या या पक्षाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सर्व सहकारी पक्षांचे आभार मानले. भविष्यातील सर्व निवडणुका […]

अधिक वाचा..