जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर; भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील 12 जिल्हा परिषदांअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी तब्बल 7438 उमेदवारांनी आपलं राजकीय भवितव्य आजमावलं. मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठी झेप घेण्याच्या तयारीत असल्याचं […]

अधिक वाचा..

बारामती तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान! प्रशासन सज्ज

बारामती: बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गटासाठी मतदान ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे, तर मतमोजणी जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे ९ फेब्रुवारीला होईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम २०२६ अंतर्गत, तालुका निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांनी […]

अधिक वाचा..

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ममता बॅनर्जींना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारयादींची पुनर्पडताळणी सुरू असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केल्याने हा प्रकार चर्चेत आला होता. मात्र, निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या ममतांना आज सुप्रीम कोर्टानेच जोरदार झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव विकासाचा ब्लूप्रिंट जाहीर

आंबेगाव: गावागावांचा विकास करणे हा शिवसेनेचा ध्यास असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देऊन ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणू, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आंबेगाव येथे उमेदवारांच्या प्रचारसभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सभेच्या सुरुवातीला नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी सांगितले की, लोकसभा-विधानसभा निवडणुकांत कार्यकर्त्यांनी […]

अधिक वाचा..

महापौर-उपमहापौर निवडणुकीत तिरंगी लढत; राष्ट्रवादीच्या ऐनवेळच्या उमेदवारीने ‘ट्विस्ट’

पुणे: महापालिका निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपकडून मंगळवारी महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्याचवेळी कॉंग्रेस पक्षानेही विरोधी भूमिका कायम ठेवत दोन्ही पदांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महापौर-उपमहापौर निवडणुकीत मोठा राजकीय ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनाचा निवडणुकांवर परिणाम? सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीला मंत्रालयात प्रवेश करणार

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पवार कुटुंबीय दुःखातून सावरत हळूहळू राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी बंधनकारक; उद्योग व खासगी आस्थापनांना शासनाचे आदेश

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले […]

अधिक वाचा..

नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करून संशयाचे ढग दूर करा मुंबई: राज्यात व केंद्रात १९९९ नंतर आघाडीचे राजकारण सुरु झालेले आहे. आघाडीच्या राजकारणात दोन पावलं मागे घ्यावी लागतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. जेथे शक्य आहे तेथे आघाडी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना दिले होते. नगरपालिका […]

अधिक वाचा..

निवडणुकीआधी भाजप आमदार अडचणीत! घटस्फोट न घेता दुसऱ्या विवाहाचा आरोप

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, खडगपूरचे भाजप आमदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेते हिरण चटर्जी मोठ्या वादात सापडले आहेत. घटस्फोट न घेता प्रसिद्ध मॉडेल रितिका गिरी हिच्याशी वाराणसीत दुसरा विवाह केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR) केला आहे. वाराणसीत विवाहाचे फोटो व्हायरल हिरण चटर्जी आणि रितिका […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस […]

अधिक वाचा..