भाजपा युती सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर पूर्ण सरकारच भ्रष्ट

मुंबई: महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा युती सरकार असो, या सकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजपा युती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

मध्यान्न भोजन योजनेतील अंडी व फळांसाठी सरकारनेच निधी द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

मुंबई: भाजपा युती सरकारने आता शाळकरी मुलांच्या आहारावरच गदा आणली आहे. मध्यान्न भोजन योजनेतून शाळकरी मुलांना आहारातून प्रोटीन मिळावे यासाठी अंडी व फळे दिली जात होती. परंतु भाजपा युती सरकारने आता अंडी व फळांना निधी देण्यास नकार देत शाळा व्यवस्थापनांनी स्वतः खाजगी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करावेत असा जीआर काढला आहे. सरकारचा हा निर्णय सरकारी शाळांमध्ये […]

अधिक वाचा..

विधानसभा निवडणुकीत प्रचंड वाढलेले मतदार केंद्र सरकारने बांग्लादेशातून आणले होते का

मुंबई: भाजपा सरकारच्या काळात मतदारांचे मतदानही सुरक्षित राहिलेले नाही. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यात मोठा घोटाळा केला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहिर केलेली मतदार संख्या ९.७० कोटी आहे तर मोदी सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची संख्या ९.५४ कोटी असल्याचे जाहीर केले आहे, निवडणूक आयोगाने ही वाढीव संख्या कोठून आणली? मतदानादिवशी संध्याकाळी जाहीर केलेली ५८ टक्के […]

अधिक वाचा..

महिला व बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील; आदिती तटकरे

मुंबई: महिला आणि बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण संवेदनशीलतेने काम करत असून त्यांच्याशी संबंधित योजना आणि कार्यक्रमांची प्रभावी, पारदर्शक आणि दर्जेदार अंमलबजावणी केली जात आहे जेणेकरून विकसित भारत… विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करता येईल, अशा शब्दात आपल्या भावना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. महिला आणि बालकांच्या विकासाला गती […]

अधिक वाचा..

त्या सरकारी निरीक्षणगृहातील अधीक्षकांची तात्काळ हकालपट्टी करा

मुंबई: उल्हासनगर येथील सरकारी निरीक्षणगृहातील कार्यरत असलेल्या अधीक्षकांची हकालपट्टी करत विशेषगृहातील सेवक दर तीन वर्षानी बदलावे अशी विनंती विधान परिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महिला व बाल विकास प्रशासन यांच्याकडे केली आहे. उल्हासनगर मुलींच्या सरकारी निरीक्षणगृहातून ८ मुली पळून गेल्या होत्या. याबाबत घटनास्थळी माहिती घेतली असता प्रामुख्याने मुलींना चांगले स्वच्छतागृह नाहीत. जेवणाची व्यवस्थित सोय नाही. […]

अधिक वाचा..

राज्यातील ग्रामपंचायती ९ जानेवारीला बंद, सरकारकडे केल्या या मागण्या 

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायतींनी ९ जानेवारीला काम बंद आंदोलन जाहीर केले असून, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, सरपंच यांच्या सुरक्षेसाठी विविध मागण्या शासनाकडे मांडल्या आहेत. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करणारे हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. मुख्य मागण्या आणि त्यामागील कारणे सरपंच व कर्मचाऱ्यांसाठी संरक्षण कायदा गावपातळीवरील काम करताना […]

अधिक वाचा..

धान-भरडधान्य खरेदीसाठी शासकीय पोर्टलवर नोंदणी करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती मुंबई: शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधिच्या मागणीस अनुसरून शासनाने नोंदणीसाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक […]

अधिक वाचा..

कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकार ठरले अपयशी; अंबादास दानवे

नागपूर: सत्ताधारी सरकार राज्याची कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरले आहे. कापूस, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी देशोधडीला लावले आहे. जनतेच हित न साधता स्वतःच हित जपणारे हे स्वार्थी व अकार्यक्षम सरकार असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणात केली. राज्य थांबणार नाही, हे ब्रीदवाक्य हे सरकार सतत म्हणत असलं तरी […]

अधिक वाचा..

गतिमान सरकार शेतकरी, विद्यार्थी, जनतेचे प्रश्न सोडविण्यास ठरले अकार्यक्षम

नागपूर: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास सरकारला आलेलं अपयश , उद्योग विभागात राज्याचा घसरलेला क्रमांक, बनावट औषधे घोटाळा, जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था आदी प्रश्न सोडविण्यास गतिमान सरकार अकार्यक्षम ठरले आहे, अशा खरमरीत शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. देशात महाराष्ट्राचे उद्योगातील स्थान 13 व्या क्रमांकावर घसरले आहे. उद्यम योजनेत छोटे आणि लघु […]

अधिक वाचा..

भाजपा युती सरकारच्या काळात गुंडाराज; महाराष्ट्रात फोफावलेल्या गुंडाराजचा अंत करा

मुंबई: परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या असून या हत्येप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही? राजकीय आशिर्वादाने महाराष्ट्रात सुरु असलेल्या गुंडाराजचा कायमचा […]

अधिक वाचा..