रामलिंग ग्रुप ग्रामपंचायतीच्या बाबुरावनगरात नागरिक त्रस्त; चेंबर चोक, रस्त्यांची दुर्दशा 

शिरूर (अरुणकुमार मोटे): रामलिंग ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील बाबुरावनगर या मोण्या उपनगरामध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे. बाबुरावनगरचा विकास ठप्प झाला असून नागरिक मात्र संतप्त झाले आहे. रस्त्यावरील चेंबर चोक झाल्यामुळे संपूर्ण परिसरातील ड्रेनेज व्यवस्थाच कोलमडली असून, दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.स्थानिक रहिवासी उद्धव जाधव यांनी सांगितले की, “आमच्या […]

अधिक वाचा..

केंदूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगल साकोरे यांची बिनविरोध निवड

पाबळ: शिरूर तालुक्यातील केंदूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मंगल अरुण साकोरे व उपसरपंच पदी कल्पना थिटे यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी मंगल साकोरे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला. केंदूर ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच व उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच […]

अधिक वाचा..

साबळेवाडी येथे ग्रामपंचायतीच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील साबळेवाडी गावठाणात शासकीय मालकीच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ जून २०२५ रोजी आरोपी भागा हरी भाईक […]

अधिक वाचा..

रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना तातडीने मार्गी लावा

रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक मुंबई: पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार […]

अधिक वाचा..
SARPANCH

सरपंच, उपसरपंचांचे मानधन झाले दुप्पट; पाहा मानधनाची रक्कम…

मुंबई: ग्राम पंचायतीची धुरा सांभाळणाऱ्या सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केली आहे. आता सरपंचांना १० हजार रूपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सरपंच, उपसरपंचांना मिळणार आहे. सरपंच व उपसरपंचांना अतिशय कमी मानधन दिले जात होते. त्यामुळे मानधनात वाढ करावी, अशी मागणी राज्यभरातील सरपंच संघटनांकडून केली जात होती. सरपंच, उपसरपंचांचे […]

अधिक वाचा..
koregaon-gram-panchayat

ऐन दिवाळीत कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीसमोर दिव्यांगांचे बोंबाबोंब आंदोलन…

कोरेगाव भीमा: शिरूर तालुक्यातील दिव्यांगांनी ऐन दिवाळी सणामध्ये ग्राम पंचायत कोरेगाव भीमा (ता. शिरूर) समोर दिव्यांग निधि जमा करतो, असे आश्वासन देत फसवणाऱ्या ग्रामसेवक रतन दवणे व ग्रामपंचायत कोरेगाव भीमा यांच्या गलथान व निर्दयी कारभारविरोधात मनगटावर चुना लावून बोंबाबोंब आंदोलन केले. दिव्यांगांचे पैसे जमा करायचे नव्हते तर आमच्याशी खोटे कशाला बोलायचे? आम्हाला महाराष्ट्र बँक व […]

अधिक वाचा..
saradwadi-grampanchayat

सरदवाडीत सत्तांतर, दिग्गजांचा पराभव करत तरुणाईकडे सत्ता…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांचा पराभव करत तरुणाईने सत्ता आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले असुन, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे यांच्या रामलिंग परिवर्तन पॅनलने माजी लोकनियुक्त सरपंच विलास कर्डीले यांच्या सरदवाडी विकास आघाडी पॅनलचा पराभव करत 8/1 अशा मताधिक्याने सत्ता काबीज केली आहे. सरदवाडी (ता. शिरुर) हे गाव पुणे-नगर […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

ग्रामपंचायत निवडणूक! दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का…

पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज (सोमवार) लागले आहेत. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का बसला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी प्रचार करूनही त्यांचा संतोष टावरे हा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. रवींद्र वळसे पाटील हा शिंदे गटाचा उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या राजकारणाचे केंद्रस्थान […]

अधिक वाचा..
gram-panchayat-election

शिरुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीत कही खुशी कही गम; विजयी उमेद्वारांची नावे पाहा…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे निकाल आज (सोमवार) लागले असून, अनेक ठिकाणी प्रस्थापितांनी आपले गड राखले आहेत. काही ठिकाणी प्रस्थापितांना पराभव स्वीकारावा लागला. शिरुर तालुक्याचे लक्ष लागलेल्या रांजणगाव ग्रामपंचायत मध्ये मंगलमुर्ती ग्रामविकास पॅनलचे 14 तर विरोधी पॅनलचे 2 आणि 1 अपक्ष उमेदवार निवडून आला. रांजणगाव मध्ये अटीतटीच्या लढतीत शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे […]

अधिक वाचा..
grampanchayat

बांधकाम विभागाच्या मुजोर अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): माळवाडी (ता. शिरूर) गावातील रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे तसेच कामाचे स्वरूप समजून घेण्यासाठी कामाची वर्क ऑर्डर आणि इस्टीमेट मागितले म्हणून सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची धमकी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याने दिल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यात घडल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माळवाडी (ता. शिरूर) येथील माळवाडी-भैरवनाथवाडी-टाकळी हाजी या रस्त्यासाठी सहकारमंत्री […]

अधिक वाचा..