saradwadi-grampanchayat

सरदवाडीत सत्तांतर, दिग्गजांचा पराभव करत तरुणाईकडे सत्ता…

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांचा पराभव करत तरुणाईने सत्ता आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले असुन, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे यांच्या रामलिंग परिवर्तन पॅनलने माजी लोकनियुक्त सरपंच विलास कर्डीले यांच्या सरदवाडी विकास आघाडी पॅनलचा पराभव करत 8/1 अशा मताधिक्याने सत्ता काबीज केली आहे.

सरदवाडी (ता. शिरुर) हे गाव पुणे-नगर रस्त्यावरील महत्वाचे गाव आहे. गेली पाच वर्षे या गावात राष्ट्रवादीचे विलास कर्डीले हे लोकनियुक्त सरपंच म्हणून गावाचा कारभार पाहत होते, परंतु या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणाईने सोशल मीडियाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर देत प्रचार यंत्रणा राबवत सत्ताधाऱ्यांचा पराभव करत एकतर्फी विजय खेचून आणला.

माजी लोकनियुक्त सरपंच व अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेले माजी सरपंच विलास कर्डिले यांचा युवा उमेदवार गणेश सरोदे यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केल्याने ते या निवडणूकीतले “जायंट किलर” ठरले आहेत.

“अन रिक्षा स्पीडने सुसाट पळाली…”
सरदवाडी ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते, सरपंचपदाच्या उमेदवार लक्ष्मीबाई बाळासाहेब जाधव या मोठया मताधिक्याने निवडुन आल्या, त्यांचे चिन्ह हे ऑटोरिक्षा होते, त्यांचे पती बाळासाहेब जाधव हे रिक्षाचालक आहेत, व त्यांना निवडणूकीत चिन्ह सुद्धा रिक्षाच मिळाल्याने, सगळीकडे रिक्षा सुसाट वेगाने पळाली अशीचं चर्चा सुरु आहे.

निवडुन आलेले उमेदवार
रामलिंग परिवर्तन पॅनल
लक्ष्मीबाई बाळासाहेब जाधव (लोकनियुक्त सरपंच)

प्रभाग क्रं 1
उमेश आबासाहेब सरोदे
सोमनाथ नानाभाऊ सरोदे
मोनाली रविंद्र कर्डीले

प्रभाग क्रं 2
गणेश कारभारी सरोदे
शिल्पा अनिल घावटे
विद्या दिपक सरोदे

प्रभाग क्रं 3
आशा सुभाष घावटे
सुरेखा चंद्रकांत निरवणे

सरदवाडी विकास आघाडी पॅनल
1) कृष्णा श्रीकांत घावटे

रांजणगाव गणपती निवडणुक निकालानंतर बापूसाहेब शिंदे यांनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार

ग्रामपंचायत निवडणूक! दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का…

शिरुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीत कही खुशी कही गम; विजयी उमेद्वारांची नावे पाहा…

शिरुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल Live…

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव व कर्डेलवाडी येथे मतदान शांततेत

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!