grampanchayat

बांधकाम विभागाच्या मुजोर अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करा…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): माळवाडी (ता. शिरूर) गावातील रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे तसेच कामाचे स्वरूप समजून घेण्यासाठी कामाची वर्क ऑर्डर आणि इस्टीमेट मागितले म्हणून सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची धमकी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याने दिल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यात घडल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

माळवाडी (ता. शिरूर) येथील माळवाडी-भैरवनाथवाडी-टाकळी हाजी या रस्त्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून 7 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भूमिपूजन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते (ता. 3) झाल्याबरोबर लगेचच पहिल्या टप्प्यातील 2 कोटी 80 लाख निधीच्या कामाची माळवाडी फाटयापासून सुरुवात झाली. यामुळे माळवाडी ग्रामस्थ समाधान व्यक्त करत होते.

कामास प्रारंभ झाल्यानंतर रस्त्यासाठी वापरला जाणारा मुरूम हा निकृष्ट दर्जाचा असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच सरपंच सोमनाथ भाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नवनाथ शेळके यांच्याशी संपर्क साधून माहिती देत त्यांच्याकडे वर्क ऑर्डर आणि इस्टीमेट ची मागणी केली. मात्र, या अधिकाऱ्याने कोणतीही शहानिशा न करता हे काम राज्य शासनाचे आहे, इथे लक्ष घालण्याचा तुम्हास काहीच अधिकार नाही, तुम्ही ग्रामपंचायत पुरते पहा, या कामात अडथळा आणला म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करेल, अशी तंबी दिली.

यामुळे माळवाडी ग्रामस्थांच्या आनंदावर विरंजन फिरले. नागरिक संतप्त झाले असून या मुजोर अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या अधिकाऱ्याची तक्रार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच कार्यकारी अभियंता आर वाय पाटील यांच्याकडे करणार असल्याचे सरपंच सोमनाथ भाकरे यांनी सांगितले.

महागणपती मुक्तद्वार दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा: स्वाती पाचुंदकर

शिरुर नगरपरिषदेच्या हद्दीतील पदपथावरील विजेच्या खांबातून होतेय वीज चोरी

शिरूर तालुक्यात अवैध्य मुरुम, वाळू उपसा; महसुल प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष?

शिरुर तालुक्यातील कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली कानउघडणी

पुणे जिल्हाधिकारी यांनी शिरुर नगरपरिषदेला कारवाई करण्याबाबत काढला आदेश

1 thought on “बांधकाम विभागाच्या मुजोर अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करा…

Comments are closed.