मुंबई महापालिकेत महायुतीचा विजय; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया भाजप कागदावर, शिवसेना जमिनीवर

मुंबई: राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने निर्णायक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ८९ तर शिवसेनेला २९ जागा मिळाल्या असून महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीला एकूण ७१ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला २४ जागा मिळाल्या आहेत. इतर व अपक्षांचे मिळून १२ नगरसेवक निवडून आले […]

अधिक वाचा..

तो मेसेज वाचला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली…

सरकारने जलजीवन मिशन योजनांच्या कामांचे पैसे न दिल्याने निराश होऊन सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावातील 35 वर्षीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हर्षल पाटील यांची सरकारकडे 1 कोटी 40 लाखांची बिले थकीत होती. सावकार व इतर लोकांकडून त्यांनी जवळपास 65 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यांनी पैशासाठी तगादा लावल्याने पाटील हैराण झाले होते. […]

अधिक वाचा..

महायुती सरकारचा कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण

मुंबई: महायुती सरकारमध्ये कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचे प्रकार उघड होत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनांमधून पैसा खाऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा उद्योग महायुती सरकारने केला आहे. कापूस साठवणूक बॅग पुरवठ्याच्या घोटाळ्यासारखाच शेतकऱ्यांना बॅटरी स्प्रेअर पुरवण्यातही भ्रष्टाचार करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या आशिर्वादाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील अधिकारी व कृषी विभागाने संगनमताने ८०.९९ कोटींच्या खरेदीत […]

अधिक वाचा..

पक्षाला मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता जमीनीवर पाय ठेवून काम करा; सुनिल तटकरे

अजित पर्व… ‘दिशा विकासाची, पुरोगामी विचारांची’ ‘नवसंकल्प’ शिबीराची शिर्डी: पक्षाला मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता जमीनीवर पाय ठेवून काम करा असे आवाहन करतानाच भविष्यात विचारांची… संघटनेची दिशा घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज शिबीरात दिले. सन २०४७ पर्यंत एक बलवान पक्ष तयार करण्याची जबाबदारी आपली असून अजितदादांच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..

खेड तालुक्यातील वाफगाव येथे आकाशातुन अज्ञात वस्तु थेट जमिनीवर…

राजगुरुनगर (प्रतिनिधी): वाफगाव (ता.खेड) येथे आकाशातुन अज्ञात वस्तु थेट जमिनिवर येत असताना पँराशुट फुटले व त्याच्या आवाजाने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये काहीवेळ खळबळ उडाली. हे सॅटेलाईटच्या निरिक्षकाचे उपकरण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून संबधित वस्तू पोलिसांनी पंचनामा करत ताब्यात घेतली. परंतु संबधित उपकरण हवामान विभागाचे असून कोणताही धोका नसल्याची माहिती हवामान विभागाने पत्राद्वारे दिल्याने सगळ्यांनाच […]

अधिक वाचा..

दि मॅजेस्टिक आमदार निवासाच्या नुतनीकरण कामाचे भूमिपूजन

मुंबई: ‘दी मॅजेस्टिक’ या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृह तथा आमदार निवास वास्तुच्या नुतनीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याचबरोबर या वास्तुच्या कोनशिलेचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक […]

अधिक वाचा..

मी कोणतही वादग्रस्त विधान केल नाही, ‘स्वराज्यरक्षक’ या भूमीकेवर मी ठाम…

मुंबई: ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून माझ्या विरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात आल्याचा घणाघात विधानसभेचे […]

अधिक वाचा..
Crime

कोंढापुरीत जमिनीत प्रवेश करत मायलेकांना मारहाण

शिक्रापूर: कोंढापुरी (ता. शिरुर) येथे जमीन मालकाच्या संमतीशिवाय त्याच्या जमिनीत जात जमीन मालकासह त्याच्या आईला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हनुमंत पांडुरंग डोमाळे, कल्पना हनुमंत डोमाळे व संतोष पोपट डोमाळे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील योगेश गायकवाड हे त्यांच्या जागेमध्ये असताना […]

अधिक वाचा..