विधानभवन येथे महिला सुरक्षा सेफ्टी ऑडिटचा आढावा; तातडीच्या अंमलबजावणीचे निर्देश

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेफ्टी ऑडिटचा आढावा घेण्यासाठी विधानभवन येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना आणि स्वारगेट बसस्थानकावरील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यातील २४२ ठिकाणी करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिटमधील शिफारशी तातडीने आणि निश्चित […]

अधिक वाचा..

मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा; प्रताप सरनाईक

मुंबई: कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने निलंबित करण्याचे सक्त निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आज मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या, तसेच काही […]

अधिक वाचा..

गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी तातडीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी

मुंबई: मुंबईतील नाइट क्लब आणि मनोरंजन स्थळांमध्ये अग्निसुरक्षेची पर्वा न केल्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांना निवेदन सादर गोवा राज्यातील नाइट क्लबमध्ये अलीकडेच घडलेल्या भीषण आगीत २५ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर, मुंबईत अशाप्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी तातडीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार […]

अधिक वाचा..

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत तातडीने द्या मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भाजपा महायुतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांना अद्याप कसलीच मदत मिळालेली नाही. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, सरसकट कर्ज माफ करावे, वीज बिलाची थकबाकी माफ करावी […]

अधिक वाचा..

कवलापूर येथे विमानतळाबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून तात्काळ सर्वेक्षण करा

मुंबई: सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे विमानतळ उभारणीबाबतची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र कार्गो व नागरी विमानतळाकरिता विमानतळ विकास प्राधिकरणाने तात्काळ सर्वेक्षण हाती घ्यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. आज मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे कार्गो विमानतळ व नागरी विमानतळ संदर्भात बैठक […]

अधिक वाचा..

राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला तातडीने मदत पुरवण्याचे पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांची त्वरित सुटका करण्याचे निर्देश

ठाणे: मराठवाड्यातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत शिंदे यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना तत्काळ मदत पुरवण्याचे […]

अधिक वाचा..

कुंडेश्वर अपघात: उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून पीडित कुटुंबांना एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार तत्काळ आर्थिक मदत

पुणे: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे ११ ऑगस्ट रोजी दर्शनासाठी नीघालेल्या भाविकांच्या वाहनाचा झालेल्या अपघातात १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडुन ना.एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार तत्काळ पुढाकार घेत पीडित कुटुंबांना आर्थिक मदत दिली आहे. नीलमताई गोर्हे यांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

पुण्यात तीन तरुणींवर बेकादेशीर कारवाई करणाऱ्या पोलीसांवर तात्काळ कारवाई करा; हर्षवर्धन सपकाळ

गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ का? मुजोर पोलिसांवर ऍट्रॉसिटी कलामाखाली गुन्हे दाखल करा मुंबई: राज्यातील पोलीस यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि पोलीस मात्र सर्वसामान्य जनतेवर कायद्याची दंडेलशाही दाखवत आहेत. पुण्यातील कोथरूड पोलीसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले, त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप […]

अधिक वाचा..

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिरूरमध्ये तीव्र निषेध; हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा शिरूर शहरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील विविध सामाजिक, राजकीय व मराठा संघटनांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन सादर केले. या घटनेतील हल्लेखोर अद्याप मोकाट असून, त्यांच्या मुसक्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात लंपी रोगाचा प्रकोप; शेतकऱ्यांचे जनावरे संकटात, भरपाई व तत्काळ उपचाराची मागणी तीव्र

शिरूर (अरुणकुमार मोटे): सध्या शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये गोवंश जनावरांमध्ये लंपी स्किन रोगाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी जनावरे आजारी पडत असून काही ठिकाणी जनावरांचे मृत्यूही झाले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारी डॉक्टरांचा […]

अधिक वाचा..