मणिपूरमध्ये हैवानांचे राज्य, सरकार तात्काळ बरखास्त करा; नाना पटोले

मुंबई: मणिपूर तीन महिन्यापासून जळत आहे पण देशाच्या पंतप्रधानांना लक्ष द्यायला वेळ नाही. मणिपूरमध्ये महिलेची निर्वस्त्र धिंड काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा व्हिडिओ पाहून मन सुन्न झाले. ही घटना एका महिलेपुरती मर्यादीत नसून हा समस्त महिला वर्गावरचा अत्याचार आहे. मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून राज्य सरकार व केंद्र सरकारला परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाही. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा; नाना पटोले

मुंबई: राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. राज्यपाल व महामहिम राष्ट्रपती यांनी यात हस्तक्षेप करुन राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..

पुण्याच्या पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; पहा कारण…

मुंबई: आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज म्हणजे महाराष्ट्राच्या ३०० वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी तीव्र नाराजी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान जे सरकार स्वतः ला हिंदूत्ववादी सरकार बोलते त्या सरकारकडून वारकर्‍यांवर लाठीचार्ज होतो हे कितपत योग्य आहे याचे उत्तर […]

अधिक वाचा..

सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अन्यथा…

मुंबई: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे आज भेट घेऊन केली. दरम्यान मुंबई पोलिस […]

अधिक वाचा..

रुग्णालयात रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा; अजित पवार 

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तात्काळ थांबवावेत, अशी मागणी विधानसभेचे […]

अधिक वाचा..

औरंगाबादचे नाव तूर्तास बदलू नका…

मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश.. औरंगाबाद: औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराबाबत उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. औरंगाबादच्या नामांतर याचिकेवर सुनावणी सुरू असताना, अनेक सरकारी कार्यालयांनी नावात बदल करण्याचा झपाटा लावला आहे. ही बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. तेव्हा उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत महसूल विभाग आणि इतर कोणत्याही विभागांनी कार्यालयाच्या नावात बदल […]

अधिक वाचा..

संजय राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरण तात्काळ आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावे

मुंबई: संजय राठोड यांच्या कार्यालयात एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल तर हे प्रकरण तात्काळ आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राज्याचे केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केला असून त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना […]

अधिक वाचा..

महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: अकोला येथील अनुसूचित जामातीच्या महिलेवर अत्याचार केलेला आरोपी हा विधिमंडळाच्या परिसरात कसा फिरू शकतो? असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी सदर आरोपीला तात्काळ विधानभवनाच्या बाहेर काढून त्याला अटक करावी अशा सूचना आज विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. सन्माननीय सदस्य मा. श्री. राम शिंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत, अकोला येथील अनुसूचित जामातीच्या […]

अधिक वाचा..

अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांचे प्रश्न तातडीने सोडवा…

मुंबई: राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका-मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यापूर्वी हिवाळी […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी पोलीस अधिक्षकाला तात्काळ निलंबित करा…

शेतकरीविरोधी शिंदे-भाजपा सरकारला शेतकरीच धडा शिकवतील मुंबई: शेतमालाला दववाढ मिळावी व पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केला आहे. आपल्या न्याय व हक्कासाठी लढा देणाऱ्या अन्नदात्यावर भाजपा सरकारने निर्दयीपणे लाठीहल्ला केला आहे. या लाठीचार्ज प्रकरणी बुलढाणा पोलीस अधिक्षकांना तात्काळ निलंबित करावे व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण […]

अधिक वाचा..