ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

महाराष्ट्र

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना व्रत, उपवास आणि विविध सण-उत्सवांनी समृद्ध मानला जातो. यंदा ऑगस्ट महिन्याची सुरुवात गणपती बाप्पाला समर्पित असलेल्या संकष्टी चतुर्थीने होत असून, त्यानंतर श्रावण महिन्याला प्रारंभ होणार असल्याने संपूर्ण महिनाभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.

हिंदू पंचांगानुसार ऑगस्ट महिन्याची सुरुवात आषाढ कृष्ण पक्षातील तृतीया तिथीपासून होत असून महिन्याचा शेवट श्रावण कृष्ण पक्षातील तृतीया तिथीला होणार आहे. या कालावधीत संकष्टी चतुर्थी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमीसह अनेक धार्मिक सण साजरे केले जाणार आहेत.

ऑगस्ट महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

१ ऑगस्ट – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी

२ ऑगस्ट – संकष्टी चतुर्थी

९ ऑगस्ट – कामिका एकादशी

११ ऑगस्ट – मासिक शिवरात्री

१३ ऑगस्ट – श्रावण मासारंभ

१२ ऑगस्ट – खग्रास सूर्यग्रहण

१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन

१६ ऑगस्ट – विनायक चतुर्थी

१७ ऑगस्ट – नागपंचमी, पहिला श्रावणी सोमवार

१८ ऑगस्ट – मंगळागौरी पूजन

२३ ऑगस्ट – पुत्रदा एकादशी

२४ ऑगस्ट – दुसरा श्रावणी सोमवार

२५ ऑगस्ट – मंगळागौरी पूजन

२७ ऑगस्ट – नारळी पौर्णिमा

२८ ऑगस्ट – रक्षाबंधन

३१ ऑगस्ट – तिसरा श्रावणी सोमवार, संकष्टी चतुर्थी

यंदा चार श्रावणी सोमवार

यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात १३ ऑगस्टपासून होत असून १७ ऑगस्ट, २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर असे एकूण चार श्रावणी सोमवार येणार आहेत. या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा, रुद्राभिषेक, उपवास आणि शिवामूठ वाहण्याची परंपरा मोठ्या श्रद्धेने पाळली जाते. त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवाराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत