सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही; कायदा-सुव्यवस्थेवर सतेज पाटील यांचा सरकारवर घणाघात

विधानपरिषदेत गुन्हेगारी, महिला सुरक्षा, पोलीस दलातील रिक्त पदे, मिसिंग लिंक प्रकल्प आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारला जाब मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. “सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही,” […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील राजकारण तापले; आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा, नव्या पक्षफुटीच्या चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेगआला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून हे शेवटचे पावसाळी अधिवेशन असेल, असा खळबळजनक दावा शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात जातील, असा […]

अधिक वाचा..

जागतिक MSME दिनानिमित्त वाशीत ‘महाराष्ट्र MSME परिषद व पुरस्कार 2026’

मुंबई: जागतिक एमएसएमई (MSME) दिनानिमित्त महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) तर्फे शनिवारी (27 जून) वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात ‘महाराष्ट्र MSME परिषद व MSME पुरस्कार 2026’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणाऱ्या या परिषदेत राज्यभरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील सुमारे 2,500 हून अधिक उद्योजक, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : महायुतीचा दणदणीत विजय, 17 पैकी 16 जागांवर कब्जा

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने मोठे यश संपादन करत 17 पैकी तब्बल 16 जागांवर विजय मिळवला आहे. अनेक मतदारसंघांत उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवारांनी दमदार कामगिरी नोंदवली. विजयी उमेदवारांची यादी छत्रपती संभाजीनगर – जालना : सुहास शिरसाट (भाजप) ठाणे : […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात गैरव्यवहाराचा आरोप; चौकशीची मागणी

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी विकासाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणात मोठ्या अनियमिततेचा आरोप समोर आला आहे. पदानुसार निश्चित करण्यात आलेले वेतन आणि प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करण्यात येत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार टेंडर क्लार्क, टॅली ऑपरेटर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राची शेती! संकट, वास्तव आणि भविष्यातील दिशा

मुंबई: महाराष्ट्र हा संत, समाजसुधारक आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा प्रदेश आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आजही शेतीच आहे. ऊस, कापूस, सोयाबीन, कांदा, डाळी, फळबागा आणि भाजीपाला उत्पादनात महाराष्ट्राने देशात वेगळी ओळख निर्माण केली असली, तरी शेती क्षेत्र अनेक दशकांपासून विविध संकटांशी झुंज देत आहे. या संकटांचा विचार करताना दोषारोपांपेक्षा वस्तुस्थिती आणि उपाययोजनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कोरडवाहू […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात प्रथमच PLFS आणि ASUSE सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यात प्रथमच राबविण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) येथे आयोजित विभागीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. कोकण व पुणे विभागातील क्षेत्रीय कामासाठी नियुक्त अन्वेषक आणि […]

अधिक वाचा..

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर आर्थिक आणि संसाधनांच्या टंचाईची शक्यता निर्माण झाली असताना, महाराष्ट्र शासनाने राज्यभरात संसाधन बचत आणि आर्थिक शिस्तीवर भर देणारे महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या या परिपत्रकात इंधन बचत, ऊर्जा संवर्धन, डिजिटल प्रशासन, नैसर्गिक शेती आणि सार्वजनिक वाहतूक वापर […]

अधिक वाचा..

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत धर्मांमध्ये भांडवणे लावण्याचे कारस्थान सुरु आहे, आपण सर्वांनी मिळून हा कुटील डाव हाणून पाडण्याची आवश्यकता असून महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करू असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या […]

अधिक वाचा..

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सामाजिक, आर्थिक आणि कामगार क्षेत्रातील स्थितीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०७ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानातून उभा राहिलेला महाराष्ट्र आज त्यांच्या स्वप्नांप्रमाणे घडतो आहे का, यावर चर्चा रंगत आहे. राज्यात […]

अधिक वाचा..