महाराष्ट्रात कामगार कायद्यांचे नवे मसुदे जाहीर; ४५ दिवसांत हरकती-सूचना मागविल्या

मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या ‘औद्योगिक संबंध संहिता, २०२०’ आणि ‘वेतन संहिता, २०१९’च्या धर्तीवर तयार करण्यात आलेले ‘महाराष्ट्र औद्योगिक संबंध नियम, २०२६’ आणि ‘महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२६’ हे मसुदे २८ एप्रिल २०२६ रोजी राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या […]

अधिक वाचा..

बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्र पेटला; माफी नंतरही वाद कायम

शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप; राज्यभर आंदोलन, राजकीय प्रतिक्रिया तीव्र नागपूर: धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात तीव्र वाद निर्माण झाला आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी सत्ता समर्थ रामदास यांच्याकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती” असे विधान केले. […]

अधिक वाचा..

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयासोबतच दीर्घकाळ कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला […]

अधिक वाचा..

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “उडता पंजाबप्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकार करत असून, राज्यातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही,” असा इशारा दिला. मुंबईतील टिळक भवन येथे माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. त्यांनी […]

अधिक वाचा..

पुतळ्यांवरून वाद! महाराष्ट्रात वाढते तणावाचे राजकारण; नियम असूनही संघर्ष का?

अंजनगाव: महाराष्ट्रात महापुरुषांच्या पुतळ्यांवरून पुन्हा एकदा सामाजिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून मराठा आणि धनगर समाज आमनेसामने आले असून, परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. खेळोबा देवस्थानाजवळ पुतळा उभारण्यात आल्याने धनगर समाजाने आक्षेप घेतला आहे. ही जागा त्यांच्या देवस्थानाची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर मराठा समाजाचे प्रतिनिधी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे ‘चित्रपताका’त्रैमासिक प्रकाशित

महिला दिन विशेष अंकातून मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीविश्वाचा वेध मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने निर्मित व प्रकाशित केलेल्या ‘चित्रपताका’ या पहिल्या त्रैमासिकाचे प्रकाशन बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी संपादक तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’या विषयावर आधारित हे मासिक असून जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात सुधारित ‘शक्ती’ कायदा मंजूर; डिजिटल छळ व ॲसिड हल्ल्यांवर कडक कारवाई

महिला सुरक्षेसाठी मोठे पाऊल; BNS मध्ये राज्याच्या विशेष दुरुस्त्या समाविष्ट मुंबई: महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी सुधारित ‘शक्ती’ कायदा अखेर मंजूर करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता मध्ये राज्यस्तरीय दुरुस्ती करून या कायद्याच्या महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला असून, ‘भारतीय न्याय संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक २०२६’ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकमताने मंजूर झाले. मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा दमदार विजय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिनंदन

पुणे: वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या जिद्द, ताकद आणि उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावत कुस्तीप्रेमींची मने जिंकली. या उल्लेखनीय यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेतील उपविजेता महेंद्र गायकवाड यांनीही तितक्याच दमदार कामगिरीतून प्रेक्षकांची दाद मिळवली. अंतिम लढत अत्यंत […]

अधिक वाचा..

खरात म्हणजे महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत खरातला थेट आसाराम बापू आणि गुरमीत राम रहिम सिंह यांच्यासारखा संबोधले. महिलांचे शोषण करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास “५८ नव्हे तर शेकडो व्हिडिओ समोर येतील,” असा गंभीर दावा त्यांनी केला.गांधी भवन येथे माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, “महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा […]

अधिक वाचा..

धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६! संरक्षण की स्वातंत्र्यावर गदा? महाराष्ट्रात नवा वाद पेटला

मुंबई: राज्य सरकारने सादर केलेल्या ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ मुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. बेकायदेशीर, फसवणूक किंवा सक्तीच्या धर्मांतरांवर आळा घालण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात आले असले, तरी त्यातून वैयक्तिक स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेवर गदा येत असल्याची तीव्र टीका होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा कायदा कोणत्याही धर्माच्या […]

अधिक वाचा..