Video; रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील उज्जैन यात्रेच्या बसवर अज्ञातांकडुन दगडफेक

शिरुर (तेजस फडके) रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर तसेच शेखर पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखाली श्री महाकालेश्वर उज्जैन दर्शनासाठी निघालेल्या बसवर श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे अज्ञातांकडुन दगडफेक करण्यात आली. या बसमध्ये महिला आणि लहान मुलेही प्रवास करत होते. या घटनेमुळे भाविकांकडुन संताप व्यक्त केला जात आहे. श्री महाकालेश्वर उज्जैन यात्रेवर झालेल्या […]

अधिक वाचा..

शिरुरच्या नेमबाजांचा राज्यस्तरावर डंका समृद्धीला रौप्य तर श्रावणीला कांस्यपदक

शिरुर (अरुणकुमार मोटे) नागपुर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरुर तालुक्याच्या दोन मुलींनी नेमबाजी प्रकारात कौतुकास्पद मिळवलं आहे. शिरुरच्या युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या समृद्धी अजय चव्हाण तसेच श्रावणी संतोष वाळके यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळवत शिरुरचा झेंडा राज्यस्तरावर फडकावला आहे. या स्पर्धेत १० मीटर पिप साईट एअर रायफल या प्रकारात […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘एकता दौड’

रांजणगाव गणपती (तेजस फडके) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता दिवस (Run For Unity) या घोषवाक्याखाली रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या वतीने “एकता दौड मॅरेथॉन” स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत पार पडलेल्या या मॅरेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शालेय विद्यार्थी, […]

अधिक वाचा..

रांजणगाव एमआयडीसी पोलीसांकडून सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रमाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस विभागातर्फे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभुमीवर नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत जागरुक करणे आणि फसवणुकीपासुन बचाव करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेस शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक प्रशांत ढोले तसेच रांजणगाव […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पारोडी गावात उद्या पिरसाहेबांची यात्रा

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली सुप्रसिद्ध पिरसाहेबांची पारंपरिक यात्रा उद्या मंगळवार (दि २८) ऑक्टोबर रोजी दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरी होणार असुन या यात्रेला राज्यभरातुन दरवर्षीप्रमाणे हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. पारोडी येथील पिरसाहेब यात्रेची सुरुवात सोमवारी मध्यरात्री १२ च्या दरम्यान पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुक निघाल्यानंतर संदल होणार आहे. त्यानंतर फुलांची […]

अधिक वाचा..

शिंदोडी विकासोच्या वतीने सभासदांना ८ लाख ७१ हजारांचा लाभांश वाटप

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सभासदांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि विश्वासार्ह ठरत असुन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे संस्थेने सभासदांना एकूण ८ लाख ७१ हजार ७९६ रुपयांचा लाभांश जाहीर करत तो लाभांश सभासदांच्या खात्यात वितरित करण्यात आला. हा लाभांश संस्थेचे संस्थापक व संचालक आणि शिंदोडी गावचे माजी […]

अधिक वाचा..

आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे २६ वर्षांपासूनचे व्रत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे दिवाळीचे ३ दिवस सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत मुंबई: दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे या सणाचे वर्णन केले जात असले तरी आजही समाजातील लाखो लोक या सण, उत्सवापासून वंचित आहेत. आपण दिवाळीचा आनंद आपल्या कुटुंब व मित्रपरिवारासह साजरा करतो पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी दिवाळी म्हणजे […]

अधिक वाचा..

Video; घोड धरण नक्की कुणाच्या मालकीच…? पाटबंधारे खाते, राजकीय नेते की वाळू माफिया…?

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखों हेक्टर शेतीला वरदान ठरलेलं घोड धरण हे नक्की कुणाच्या मालकीच आहे असा प्रश्न सध्या घोड धरणाच्या पाण्यावर अवलंबुन असणाऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. कारण घोड धरणात गेल्या एक वर्षांपासुन बेकायदेशीररीत्या रात्रीच्या वेळेस बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सलग […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्हाला एखाद्या मंगल उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल. यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा. राजकारणातही तुमची प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आज एक खास डील फायनल होऊ शकते जी तुमच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या […]

अधिक वाचा..

शिरुरच्या ७ जिल्हा परिषद गट तसेच १४ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी आज दि १३ ऑक्टोबर २०२५ आरक्षण सोडत उत्साहात पार पडली. शिरुर तहसिल कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी विठ्ठल जोशी व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत चिठ्ठी पद्धतीने ही सोडत घेण्यात आली. विशेष म्हणजे या वेळी नागरिक व इच्छुक प्रतिनिधींची उपस्थिती अत्यल्प होती. ज्यामुळे या सोडतीबाबत “उदासीनतेचे” वातावरण […]

अधिक वाचा..