मानसिंग पाचुंदकर पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश
कान्हूर मेसाई (सुनिल जिते) शिरुर तालुक्यात कान्हूर मेसाई परीसरात गेल्या काही महिन्यांपासुन बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. परंतु शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी नाईलाजाने जीव मुठीत धरतं रात्री शेतात जावे लागत होते. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले होते. परंतु कान्हूर मेसाईसह परिसरातील शेतकऱ्यांना आता दिवसा विजपुरवठा मिळणार आहे.
रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात माजी मंत्री तसेच आंबेगाव-शिरुर मतदार संघांचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांचा नुकताच दौरा झाला. यावेळी शेतकऱ्यांनी कान्हूर–मेसाई परिसरासाठी दिवसा वीजपुरवठ्याची मागणी केली होती. या मागणी नंतर आंबेगाव–शिरुर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी महावितरणकडे तातडीने याचा सतत पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावला.

महावितरणने आज शुक्रवार (दि २१) पासुन कान्हूर–मेसाई सबस्टेशन अंतर्गत सर्व फिडरला दिवसा नियमित वीजपुरवठा केला जाणार आहे. वरुडे, चिंचोली (मोराची), शास्ताबाद, मिडगुलवाडी, कान्हूर-मेसाई, खैरेवाडी, हिवरे, मंडळवाडी, घोलपवाडी या सर्व गावांना आजपासुन दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सध्या हिवाळा चालु असल्यामुळे ऐन थंडीत दिवसा वीज मिळाल्याने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

त्यामुळे कान्हूर-मेसाई तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी दिलीपराव वळसे पाटील तसेच मानसिंग पाचुंदकर पाटील यांचे आभार मानले आहेत. तसेच दिवसा विजपुरवठा सुरु झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कान्हूर-मेसाई तसेच परिसरातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस शेतात पाणी धरण्यासाठी जावे लागत होते. परंतु बिबटयाच्या भीतीने शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत होते. याबाबत दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले. वळसे पाटलांनी याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना केल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा करणे शक्य झाले.
मानसिंग पाचुंदकर पाटील
अध्यक्ष:- आंबेगाव-शिरुर राष्ट्रवादी काँग्रेस
कान्हूर मेसाई परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी
शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी