पिंपरखेडमध्ये ऊस तोडताना आढळले चार बिबट्याचे बछडे

शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड येथे आज बुधवार (दि. २) रोजी बाळासाहेब पांडुरंग दरेकर यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु होती. ऊस तोडणी सुरु असताना ऊसाच्या सरीमध्ये बिबट्याचे लहान चार बछडे आढळून आले असुन त्यांचे वय अंदाजे दहा दिवस आहे. ऊसतोडणी कामगारांनी शेतमालक व संबंधित कारखान्याचे अधिकारी यांना ही माहिती दिली. याबाबत वनविभागास कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी यांना […]

अधिक वाचा..

घोडगंगाच्या कामगारांचे हक्काचे पैसे द्या, त्यांचा तळतळाट घेऊ नका: सुधीर फराटे

न्हावरे (तेजस फडके): ज्यांच्या कष्टातून घोडगंगा सहकारी साखर कारखाना सध्या सुरु आहे. त्या कामगारांचे गेल्या सात महिन्यांपासून वेतन थकीत आहे. कामगारांना १२ टक्के पगारवाढ जाहीर करण्यात आली होती. परंतु एप्रिल २०१९ पासून आजपर्यंतचा फरक थकीत असुन कामगारांचे रिटेंशन सन २००९-१० पासून मिळाले नाही. कामगारांचा पी एफ जून २०२२ पासुन भरलेला नाही. विमा पॉलिसीचे हप्ते सात […]

अधिक वाचा..

आमदारांनी मैत्रिणीवर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

औरंगाबाद: नेहमी वेगवेगळ्या कारणांनी सदैव चर्चेत राहणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर त्यांची मैत्रीण ईशा झा यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी कन्नड शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे हर्षवर्धन जाधव यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ ईशा यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ईशा झा यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की हर्षवर्धन जाधव यांनी […]

अधिक वाचा..

शहरात मेट्रोसाठी दोन उड्डाणपुल पाडावे लागणार…

औरंगाबाद: काल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासमोर स्मार्ट सिटी कार्यालयात मेट्रोच्या कामाच्या डीपीआरचे सादरीकरण करण्यात आले. यानुसार शहरातील दोन उड्डाणपूल पाडावे लागणार असल्याची माहिती आहे. यानुसार शहरातील मोंढानाका, सेव्हनहिल उड्डाणपूल मेट्रोमुळे पाडावे लागणार आहेत. क्रांती चौक आणि सिडको येथील उड्डाणपूल कामात येतील अशी माहिती आहे. अखंड उड्डाणपूल..! अखंड […]

अधिक वाचा..

आमच्यावर टिका करता तर तुम्ही स्वतःला आणि मुलाला उमेदवारी का घेतली?: दादा पाटील फराटे

निर्वी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखान्याची रणधुमाळी सुरु झाली असुन ऐन थंडीतही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे राजकीय वातावरण मात्र तापले आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि शेतकरी विकास पॅनलचे अशोक पवार यांनी घोडगंगा किसान क्रांती पॅनलला उमेदवार मिळत नसल्याने एकाच गावातले दोन उमेदवार उभे केले असल्याची टिका केली होती. याला प्रतिउत्तर देताना […]

अधिक वाचा..

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश, रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

चाकण: यंदाच्या पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडल्याने व रस्ता उखडल्याने खराब झालेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश आले असून नुकतीच खेड तालुक्यातील लांबीतील दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे. ही कामे लवकरच पूर्ण होऊन वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही काळापासून तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील मोठे-मोठे […]

अधिक वाचा..

शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदभरती करण्यास शासन सकारात्मक

मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अनुदानित महाविद्यालयात शारिरीक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पद भरती आणि राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित अनुदान वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रिक्त पदांचा तसेच वस्त्रोद्योग विभागातील सुतगिरण्यांच्या पुनर्वसनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात कारच्या धडकेत दुचाकीवरील बापलेक जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठन फाटा येथून दुचाकीहून चाललेल्या बापलेकांना एका कारने धडक दिल्याने बापलेक जखमी झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बापलेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथून संभाजी तरपेवाड त्यांच्या ताब्यातील एमएच २६ ए एक्स ७१८२ या दुचाकीहून त्यांचा मुलगा दर्शन याला घेऊन […]

अधिक वाचा..

करंदी ग्रामपंचायत इमारतीची नऊ वर्षातच दुरवस्था

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत इमारतीला नऊ वर्षे पूर्ण झालेले असताना सदर इमारतीची दुरवस्था होऊ लागल्याचे दिसत असल्याने तत्कालीन ठेकेदाराने नित्कृष्ठ दर्जाचे काम केलेले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. करंदी (ता. शिरुर) येथे सन २०१३ साली ग्रामपंचायत निधी व जिल्हा ग्रामविकास निधी कर्ज निधीतून ग्रामपंचायत इमारत […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या तेवीस खेळाडूंचे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या तब्बल 23 खेळाडूंनी गोवा येथे पार पडलेल्या युथ इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप मधिल तायक्वांदो खेळामध्ये घवघवीत यश संपादित केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी गोवा येथे पार पडलेल्या युथ इंडिया […]

अधिक वाचा..