वन्यजीव हि आपल्या देशाची संपत्ती; शेरखान शेख

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): प्रत्येक वन्यजीव हे आपल्या देशाची संपत्ती असून आपल्या भागातून कमी होत चाललेले वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला येथे शिरुर वनविभागाच्या माध्यमातून वनपाल ऋषिकेश लाड वनरक्षक व गणेश पवार यांच्या […]

अधिक वाचा..

नाशिक औरंगाबाद मार्गावर एका खासगी बसच्या अपघात 11 जणांचा होरपळून मृत्यू…

नाशिक: नाशिक ते औरंगाबाद मार्गावर एका खासगी बस आणि टेम्पोची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसला आग लागून त्यात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 38 लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. चिंतामणी […]

अधिक वाचा..

बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन भावाने प्रियकराला पाठवले यमसदनी…

औरंगाबाद: कन्नड तालुक्यात असलेल्या टापरगावात एका धक्कादायक घटना घडली असून, सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन मुलीच्या भावाने एका तरुणाला यमसदनी पाठवल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर विशाल रमेश लव्हाळे (टापरगाव, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर कृष्णा दिगंबर पवार (चिंचोली, ता. खुलताबाद) असे मुख्य आरोपीचे […]

अधिक वाचा..

दसऱ्याच्या मुहर्तावर कापसाला पहिल्याच दिवशी मिळाला एवढा भाव…

सिल्लोड: बनकिन्होळा परिसरात दसऱ्याच्या मुहर्तावर कापूस खरेदीला व्यापाऱ्यांकडून प्रारंभ करण्यात आला. व्यापारी संतोष फरकाडे व दत्ता काकडे यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर ११,००० रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. सिल्लोड प्रमाणेच पैठण तालुक्यातील टाकळी अंबड व परिसरात विविध ठिकाणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर टाकळी अंबड […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्या राशीनुसार आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा पूरेपूर उपयोग करून घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल. वृषभ: खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी […]

अधिक वाचा..

बेट भागात बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरुर) येथील सचिन जोरी या तरुणाची बिबट हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गावातील शिस्तारवस्ती येथील मंगेश सुरेश चव्हाण (वय ३३) या तरुणावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. चव्हाण हे रात्री साडेबारा च्या दरम्यान कांद्याच्या रोपांना पाणी देऊन आपल्या दुचाकीवरुन घराकडे परतत असताना शिस्तार वस्ती येथील ओढ्यानाजिक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर […]

अधिक वाचा..

9 ऑक्टोबर ला शिरुर लोकसभा मतदार संघातील युवासेनेच्या पदांकरिता मुलाखती…

पुणे: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरुर लोकसभा मतदार संघातील युवासेनेच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येणार आहेत. युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्या युवासेनेच्या सक्रीय सदस्यांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे. शिरुर लोकसभा संघातील […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर सिलेंडर वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे मंगळवार (दि 4) रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास मुख्य चौकात नगर-पुणे रस्त्यावर शिरुरकडुन एक टेम्पो गॅसचे भरलेले सिलेंडर घेऊन जात होता. त्याचवेळी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल सुरज वळेकर हे नवरात्रीनिमित्त गस्त घालत असताना त्यांनी […]

अधिक वाचा..

स्वतःच्या पक्षाचा पत्ता नसलेल्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये…

मुंबई: मुंबईतील बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला राज्यातील विविध भागातून सामान्य जनतेला खोटी माहिती देऊन भाडोत्री गर्दी जमवण्यात आली होती परंतु या जनतेने शिंदेचे भाषण न ऐकताच काढता पाय घेतला. राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या हातचे बाहुले असल्याचे राज्यातील जनतेने काल पाहिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गद्दारीचे समर्थन करत भारतीय जनता पक्षाने लिहून […]

अधिक वाचा..

दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार!

मुंबई: सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याच्या गोंडस नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या दिवाळी पॅकेजमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मंत्रीमंडळ निर्णयापूर्वीच निविदा काढण्यात आल्याने हा घोटाळा उघडकीस आला असून या दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या […]

अधिक वाचा..