वन्यजीव हि आपल्या देशाची संपत्ती; शेरखान शेख

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): प्रत्येक वन्यजीव हे आपल्या देशाची संपत्ती असून आपल्या भागातून कमी होत चाललेले वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला येथे शिरुर वनविभागाच्या माध्यमातून वनपाल ऋषिकेश लाड वनरक्षक व गणेश पवार यांच्या पुढाकाराने जागतिक वन्यजीव सप्ताहच्या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख बोलत होते.

याप्रसंगी प्राचार्य अनिल शिंदे, पर्यवेक्षक साहेबराव आंधळे, मच्छिंद्र राऊत, विनोद शिंदे, प्रकाश चव्हाण, ज्ञानदेव पुंडे, सीताराम मोहिते, संतोष साळे, धनंजय तळोले, जयश्री गायकवाड, कविता ननवरे, बशीरभाई मुलाणी, सिकंदर तांबोळी यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना सापांसह अन्य वन्य जीवांची माहिती देत, वन्य जीवांचे फायदे तसेच वन्य जीवांचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना यांची माहिती, तसेच सर्पदंश टाळण्यासाठी काय करावे, बिबट्यांचे होणारे वाढते हल्ले रोखण्यासाठी काय करावे यांसह अन्य माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्न व शंकेचे निरसन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश चव्हाण यांनी केले तर प्राचार्य अनिल शिंदे यांनी आभार मानले.