तुमच्या भागातील लाईट गेल्यास या नंबरवर द्या मिसकॉल…

संभाजीनगर: महाराष्ट्रातल्या महावितरणच्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. तुमच्या भागात कुठल्याही कारणाने वीजपुरवठा खंडित झाला असेल, तर फक्त एका मिस् कॉलवर तक्रार नोंदवून विशेष म्हणजे त्यानंतर लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. महावितरणने त्यासाठी मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. टोल फ्री क्रमांक, महावितरणचे ॲप आणि संकेत स्थळावरून सुद्धा तक्रार नोंदवता येणार आहे. या […]

अधिक वाचा..

राज्यातील पोलीसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढल्याने पोलीसांनाच संरक्षण देण्याची वेळ

मुंबई: राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस 24 तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात तीसहून अधिक हल्ले पोलीसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. या […]

अधिक वाचा..

संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढवणार

मुंबई: राज्यातील १०० आदिवासी विद्यार्थ्यांना दरवर्षी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती दिली जाते. अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी ३१ मार्चपर्यंत अर्ज मागविले जातात. संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या अर्जांची संख्या १०० पेक्षा अधिक प्राप्त झाली, तर विद्यार्थी संख्येवाढ करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले. आदिवासी समाजातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरूंच्या राखीव निधीतून देण्यात येणारे अनुदान बंद […]

अधिक वाचा..

काँग्रेसला राज्यात व देशात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी भाजपाच्या पराभवाचा संकल्प करा

मुंबई: भारत जोडो यात्रा यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राज्यात सुरु करण्यात आले असून घरोघरो जावून राहुलजी गांधींचा संदेश पोहचवा. भारत जोडो यात्रेमुळे जनतेत सकारात्मक संदेश गेला आहे. अमरावती व नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला आहे. कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही मविआचेच उमेदवार विजयी होतील. भाजपाच्या कारभाराला […]

अधिक वाचा..

चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने सतर्कता गरजेची

ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्रांना कार्यन्वित करण्याची आवश्यकता शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरातील आदी गावांमध्ये चोऱ्या, दरोड्यांची संख्या वाढू लागलेली असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान देखील होत असल्याने परिसरात पोलिसांनी ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्रांच्या मदतीने गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) जवळील अनेक गावांमध्ये मोबाईल व दुचाक्या […]

अधिक वाचा..

शिरुर वनविभागाकडून नागरिकांसाठी नवीन हेल्पलाईन नंबर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच नागरिकांना तातडीने वनविभागाची मदत मिळण्यासाठी नवीन हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आल्याची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत असताना काही ठिकाणी पाळीव प्राण्यांवर देखील बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत, तर […]

अधिक वाचा..

चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकांनी सावध रहावे; वंदना साबळे

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) सह परिसरात सध्या चोऱ्यांच्या घटना वाढू लागल्या असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून ग्रामस्थांनी सावध रहावे, असे आवाहन करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे यांनी ग्रामस्थांना केले आहे. करंदी (ता. शिरुर) येथे दोन दिवसात शाळेतील तसेच एका घरातील चोरीची घटना समोर आली असून दुसऱ्याच दिवशी शेजारील वाजेवाडी गावामध्ये देखील चोरीची घटना […]

अधिक वाचा..