शिरुर वनविभागाकडून नागरिकांसाठी नवीन हेल्पलाईन नंबर

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच नागरिकांना तातडीने वनविभागाची मदत मिळण्यासाठी नवीन हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आल्याची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली आहे.

शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत असताना काही ठिकाणी पाळीव प्राण्यांवर देखील बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत, तर नागरिकांना वनविभाग कार्यालयात संपर्क करण्यासाठी काही वेळा अडचणी येत असल्यामुळे नागरिकांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी शिरुर वनविभागाच्या वतीने ९६९९२००५५३ हा नवीन हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आलेला आहे.

शिरुर तालुक्यातील नागरिकांना वनविभागाकडून काही मदत हवी असल्यास तसेच कोठेही बिबट्या अथवा अन्य वन्यप्राणी आढळून आल्यास नागरिकांनी सदर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी केले आहे.