चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकांनी सावध रहावे; वंदना साबळे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) सह परिसरात सध्या चोऱ्यांच्या घटना वाढू लागल्या असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून ग्रामस्थांनी सावध रहावे, असे आवाहन करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे यांनी ग्रामस्थांना केले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथे दोन दिवसात शाळेतील तसेच एका घरातील चोरीची घटना समोर आली असून दुसऱ्याच दिवशी शेजारील वाजेवाडी गावामध्ये देखील चोरीची घटना घडून तीनही ठिकाणी काही मुद्देमाल चोरीला गेल्याने करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा देत बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना सांगून जा, बाहेरगावी जाताना घरात रोख रक्कम अथवा दागिने ठेवू नका, घराच्या दरवाजाला कडी कोयंडा ऐवजी सेंटर लॉकचा वापर करा, घराच्या दरवाजाला आयहोल ठेवा म्हणजे अनोळखी व्यक्ती आल्याची माहिती मिळेल, अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नका.

आजूबाजूला काही काम सुरु असल्यास कामगारांची माहिती ठेवा, रात्रीच्या वेळी बाहेरील लाईट सुरु ठेवा म्हणजे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना माहिती मिळेल, भाडेकरुठेवत असल्यास त्यांची सर्व माहिती घ्या, बाहेरगावी जाताना सोशल मिडीयावर तुम्ही बाहेर जात आहात अशी माहिती टाकू नका, शक्य असल्यास घराच्या परिसरात सीसीटीव्ही बसवावा, परिसरात संशयित व्यक्ती आढळ्यास तातडीने पोलीस पाटील तसेच पोलिसांना माहिती द्यावी, यांसह आदी सूचना करत ग्रामस्थांसह नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत चोऱ्या रोखण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील पोलीस पाटील वंदना साबळे यांनी केले आहे.