pratiksha-thube-rupika-narker

शिरूर तालुक्यातील १००% दिव्यांग व्यक्तीचे घर पाडण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती…

शिरूर (नितीन थोरात): शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील एका १००% दिव्यांग व्यक्तीचे घर पाडण्याच्या प्रशासनाच्या हालचालींना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. अभय जे. मंत्री यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा आदेश दिला असून, यामुळे एका गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. पिंपरखेड येथील रहिवासी तुकाराम दशरथ पवार हे पारंपरिक लोहार […]

अधिक वाचा..
pimperkhed-women

बिबट्याची दहशत! पिंपरखेडमधील महिलांनी स्वरक्षणासाठी गळ्यात घातला टोकदार खिळ्यांचा पट्टा…

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शेतात काम करणाऱ्या महिलांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. यामुळे पिंपरखेड गावातील महिलांनी स्वसंरक्षणासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. पिंपरखेड गावातील महिलांनी बिबट्याच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी आपल्या गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घालायला सुरुवात केली आहे. हा पट्टा […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर! पिंपरखेड परिसरातील बिबट्याचा अखेर खात्मा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात सलग तीन निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्यानंतर नागरीक आक्रमक झाले होते. यानंतर ०४ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास एका बिबट्याला ठार करण्यात शार्पशूटर व वनविभागाला यश आले आहे. तब्बल वीस दिवसांपासून भीतीचं सावट निर्माण करणाऱ्या या बिबट्याला वनविभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (ता. ४) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचूक […]

अधिक वाचा..
rohan-bombe-pimparkhed

बिबट्याने मुलाला ओढल्यानंतर रक्ताच्या गुळण्या अन् डोळे पांढरे झाले…

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे (वय १३) या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यापूर्वी 13 ऑक्टोबर 2025 रोजी शिरूरमध्ये 5 वर्षांची मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावली. रोहनच्या मृत्यूनंतर वडिलांनी न्यायाची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहनच्या वडिलांचे अश्रू थांबत नव्हते. आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी करत […]

अधिक वाचा..
leopard-sharp-shooter

शिरूर! बिबट्याच्या भीतीने ९ शाळा बंद; शार्पशुटर टीम पिंपरखेडमध्ये दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील जांबुत व पिंपरखेड परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांनी भीतीचं सावट आणखी गडद झालं आहे. गेल्या पंधरवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूची ही तिसरी घटना ठरली असून, परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी शार्पशुटर […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर! बिबट्याला शूट करण्याची दिली परवानगी…

शिरूर (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (आंबेवाडी) येथे रविवारी (ता. २) दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे (वय १३) या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. तातडीची उपाययोजना म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी संबंधित बिबट्याला ठार मारण्याची परवानगी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहन घराजवळील मोकळ्या शेतात खेळत असताना हत्तीगवतात दबा धरून […]

अधिक वाचा..
rohan-bombe-pimparkhed

शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…

शिरूर (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भरदिवसा आज (रविवार) दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने रोहन विलास बोंबे (वय १३) या मुलावर हल्ला करत ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पिंपरखेड परिसरात खळबळ उडाली आहे. पिंपरखेड येथे आज दुपारी पावणे चारच्या सुमारास रोहन विलास […]

अधिक वाचा..

पिंपरखेड ते वडनेर खुर्द रस्त्याला पिंपरखेड गावठाण नजीक मोठे भगदाड

शिरूर (अरुणकुमार मोटे): दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या पिंपरखेड ते वडनेर खुर्द रस्त्याला पिंपरखेड (ता.शिरुर) येथील गावठाण नजीक मोठे भगदाड पडल्याने मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग यांना याबाबत कोणतेही गांभीर्य राहिले नसल्याचे दिसून येत आहे. तरी सदर रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात भरावा करून रस्ता तातडीने […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या मेंढ्यानी शेतात साचलेले पाणी पिल्याने विषबाधा होऊन मेंढपाळ अंकुश सोमा कोकरे यांच्या ९ शेळ्या व ५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. तसेच मलठण येथे उष्माघाताने ४ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( दि ३) घडली होती. या दुर्दैवी घटनेने […]

अधिक वाचा..

पिंपरखेडमध्ये एक मादी बिबट जेरबंद, बिबटयाची दहशत कायम

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथे बिबट्याने महिलेवर हल्ला केलेल्या परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 6 ते 7 वर्षाची मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे. एक बिबट जेरबंद झाला असला तरी ‘भय इथले संपत नाही’ अशी परीस्थिती येथील परिसरात कायम असून बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे टाकले आहे. […]

अधिक वाचा..