माझ्या मतदारसंघाला ५८० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती चुकीची; जयंत पाटील

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत पॉंईट ऑफ इन्कॉर्मशनच्या माध्यमातून निधीचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या वाळवा मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटीचा निधी मिळाला असल्याची माहिती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकमत वृत्तपत्रामध्ये माझ्या मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटी रुपये […]

अधिक वाचा..

सरकारने ‘उमेद’च्या मोर्चाला सामोरे जाऊन प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात; नाना पटोले

मुंबई: ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद, राबिवले जात आहे. उमेदच्या कर्मचा-यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, या मागण्यांची पूर्तता करावी यासाठी उमेदच्या लाखो महिलांचा आझाद मैदानावर मोर्चा आलेला आहे. भर पावसात हा मोर्चा आलेला असून राज्य सरकारने या मोर्चाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य […]

अधिक वाचा..

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत द्या, पोकळ घोषणा नको; नाना पटोले

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली नाही, त्याचा सर्वेही केलेला नाही. सरकारकडे तलाठी, कृषी सहाय्यक ही यंत्रणा नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने तातडीने सरसकट मदत द्यावी, अशी […]

अधिक वाचा..

संकटकाळात सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी; अजित पवार

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..

… तर किरीट सोमय्या महाराष्ट्रद्रोहीच, थांबवा हा राजकीय नंगेपना हा असा असतो का स्त्रीसन्मान?

मुंबई: स्त्रीसन्मानाच्या गोष्टी करणारे देशाचे पंतप्रधान किती स्त्रीसन्मान राखतात हे दिल्लीतील कुस्तीगीर खेळाडूंच्या दोन महिने चाललेल्या आंदोलनातून दिसून आले. महिलांनी तक्रार केल्यानंतर त्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्याने त्या महिलांना आंदोलन करावे लागेल आणि त्यांची फरपट कशाप्रकारे झाली हेही जगाने पाहिले आणि आता तर स्वतःला भ्रष्टाचारांचा कर्दनकाळ म्हणणारे “हातोडा सम्राट” माजी खासदार कीरिट सोमय्या यांच्यां कथित […]

अधिक वाचा..

पक्ष एकसंघ रहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा

मुंबई: पक्ष एकसंघ रहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा, अशी विनंती कालही आणि आजही केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी रविवार (दि. 16) रोजी आम्ही शरद पवारसाहेब यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात रवी काळेंनी अशोक पवारांची साथ सोडल्याने राजकीय वातावरण तापले

शिरुर (तेजस फडके): अजित पवारांनी शरद पवारांविरूद्ध बंड करून सरकारमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडत आहे.. या घटनेचे पडसाद आता शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उमटले असून राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. आमदार ॲड.अशोक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर शरद पवारांची साथ देण्याचे ठरवले. मात्र, अशोक पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक कार्यकर्ते व पदाधिकारी शरद पवार साहेबांसोबत

मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) च्या संस्थापक पदाधिकाऱ्यांनी काल शनिवार (दि. 15) रोजी मुंबईत एका विशेष बैठकीत पक्षाच्या मूळ विचारधारेशी असलेल्या समर्पणाला दुजोरा देण्यासाठी आणि पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांना आपला अढळ पाठिंबा व्यक्त करण्यासाठी एकत्र आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील माजी पदाधिकारी आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत लोकशाही तत्त्वे, सर्वसमावेशकता […]

अधिक वाचा..

राज्यात दोन उपमुख्यमंत्री तर दोन उपसरपंच पद्धतही लागू करा…

वैजापुर तालुक्यातील माजी सरपंचांची मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी… संभाजीनगर: राज्यात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आल्याने आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाल्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात असलेल्या मनूर येथील माजी सरपंच राजीव सुदामराव साळुंके यांनी ज्याप्रमाणे राज्यात दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गावांच्या विकासासाठी दोन उपसरपंच निवड पद्धत लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कार्यकर्ते संभ्रमात, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथा-पालथ चालु असताना शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी “वेट अँड वॉच” ची भुमिका ठेवली आहे. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे सुरवातीला अजित पवार यांच्या सोबत होते. मात्र शपथविधी नंतर त्यांनी सावध पवित्रा घेत पुन्हा आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये तालुक्याचे […]

अधिक वाचा..