कोणत्याही शासकीय शाळेतील वीजपुरवठा खंडित होणार नाही…

मुंबई: शासकीय शाळांमधील वीजदेयके न भरल्याने वीजपुरवठा खंडित होणे ही बाब दुर्दैवी आहे. यापुढे कोणत्याही शासकीय शाळेतील वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी राज्य शासनामार्फत घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य सुनील राणे, संजय सावकारे, अशोक चव्हाण, ॲड.आशिष शेलार, दिलीप वळसे- पाटील आणि विरोधी पक्ष नेते अजित […]

अधिक वाचा..

आज राज्यभर वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांचे निदर्शने…

औरंगाबाद: महावितरण कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या औरंगाबाद व नाशिक शहरा मध्ये अदानी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी स्थापन करुन त्या ठिकाणी वितरणाचे कार्यक्षेत्र आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू केलेल्या आहे.तसेच उत्तरप्रदेश मधील वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने उत्तर प्रदेश सरकारच्या वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाच्या विरोधात ७२ तासाचा यशस्वी संप केला व सरकारला खाजगीकरण रद्द करण्यात भाग पाडले. महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलनाचा इशारा…

शिक्रापूरातील व्यापाऱ्यांचा विद्युत वितरण अधिकाऱ्याला घेराव शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील रोहित्र नादुरुस्त झाल्याने मागील आठवड्यापासून वीज पुरवठा खंडित असल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी विद्युत वितरण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला घेराव घालत वीज पुरवठा सुरळीत करुन देण्याची मागणी करत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील स्टेट […]

अधिक वाचा..

धारीवाल वीज प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील धारीवाल वीज प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याची आग्रही भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली. धारीवाल वीज प्रकल्पाने वीज निर्मितीसाठी आवश्यक पाणीसाठयासाठी एकच तळे बांधून साठवणूक केली. त्यामुळे जिल्ह्यातील येरुर व सोनेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पाणी साठा तळ्याची दानवे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी […]

अधिक वाचा..

कसबा पेठ व चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव करून सत्तेचा माज उतरवा…

देश जोडणाऱ्या राहुलजी गांधींबरोबर देश तोडणाऱ्या मोदींची तुलना कशी होऊ शकेल? मुंबई: भारतीय जनता पक्षाचे मंत्री, नेते हे सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करत आहेत. भाजपाकडून केला जात असलेला हा अपमान महाराष्ट्राचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला राजा समजू लागलेत तर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात वीज क्षेत्राच्या खाजगीकरणाचा निषेध

नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा कृती समितीचा इशारा शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विद्युत वितरणच्या खाजगीकरण धोरणाचा विद्युत वितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विद्युत वितरण कार्यालय समोर द्वार सभा घेऊन निषेध व्यक्त करत नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विद्युत वितरण विभागाच्या कार्यालय समोर महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्या […]

अधिक वाचा..