आज राज्यभर वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांचे निदर्शने…

महाराष्ट्र

औरंगाबाद: महावितरण कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या औरंगाबाद व नाशिक शहरा मध्ये अदानी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी स्थापन करुन त्या ठिकाणी वितरणाचे कार्यक्षेत्र आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू केलेल्या आहे.तसेच उत्तरप्रदेश मधील वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने उत्तर प्रदेश सरकारच्या वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाच्या विरोधात ७२ तासाचा यशस्वी संप केला व सरकारला खाजगीकरण रद्द करण्यात भाग पाडले.

महाराष्ट्र सरकारने स्थायी मंजूर पदावर कंत्राटी पद्धतीने कामगार भरण्याचा जो निर्णय घेतला त्यास विरोध.राज्य कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करा या व इतर मागण्याकरीता पुकारलेल्या बेमुदत संपात पाठिंबा देण्याचा महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभिंयते अधिकारी संघर्ष समितीच्या (दि. 19) रोजी झालेल्या बैठकी मध्ये निर्णय घेण्यात असून उद्या (मंगळवार) (दि. २1) रोजी महाराष्ट्रभर वीज कंपन्यातील ८६००० कर्मचारी, अभियंते व अधिकारी द्वारसभा घेऊन निदर्शने करत संपात पाठिंबा देणार आहे.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी संघर्ष समितीमध्ये सहभागी संघटनांचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर द्वारसभा घेऊन निदर्शने करावी.

आपले विनीत

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन