शिक्रापुरात वीज क्षेत्राच्या खाजगीकरणाचा निषेध

शिरूर तालुका

नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा कृती समितीचा इशारा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विद्युत वितरणच्या खाजगीकरण धोरणाचा विद्युत वितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विद्युत वितरण कार्यालय समोर द्वार सभा घेऊन निषेध व्यक्त करत नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विद्युत वितरण विभागाच्या कार्यालय समोर महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने द्वार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, सहाय्यक अभियंता बसवराज बिराजदार, अशोक पाटील, श्रीकांत ताटीकोंडा, दादा बारावकर, वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर ढाकणे, सुनील हेलोळे, सचिन शिंदे यांसह आदी उपस्थित होते.

सरकार कडून अदानी इलेक्ट्रिकल ग्रुपला देऊ घातलेल्या समांतर वीज परवाना म्हणजेच वीज क्षेत्राच्या खाजगीकरण धोरणाचा विरोध करण्यात आला असून पुढील काळामध्ये तहसील कार्यालय सह नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा देखील इशारा देण्यात आला. तसेच उर्जा क्षेत्र बचाव महाराष्ट्र बचाव अशा घोषणा देखील देण्यात आल्या, तर याबाबत बोलताना महाराष्ट्रातील सोळा कोटी जनतेच्या दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख वीज ग्राहकांच्या मालकीचा वीज उद्योग जगला पाहिजे व टिकला पाहिजे. यासाठी सदर लढाई असल्याचे विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी सांगितले.