स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसाठी आरक्षण जाहीर

औरंगाबाद: राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं आहे. छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण ठरलंय, पाहा संपूर्ण यादी छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण ठाणे: सर्वसाधारण (महिला) पालघर: अनुसूचित जमाती रायगड: सर्वसाधारण रत्नागिरी: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सिंधुदुर्ग: सर्वसाधारण नाशिक: सर्वसाधारण धुळे: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) नंदूरबार: अनुसूचित जमाती जळगांव सर्वसाधारण अहिल्यानगर: अनुसूचित जमाती (महिला) […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन जीआर काढण्याच्या तयारीत

मुंबई: ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अन्न-पाणी त्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. दरम्यान, या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर मु्ंबई हाय कोर्टात युक्तीवाद सुरू असून, यावेळी कोर्टाने राज्य सरकारला काही सूचना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठी हालचाल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षण देण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, फडणवीस जी; ७ दिवसात आरक्षण देण्याचे काय झाले

मुंबई: मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तीच भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही. हा आजचा प्रश्न नसून अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण भाजपा व फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात इम्पिरिकल डेटा दिला नाही म्हणून गेले. सत्ता द्या ७ दिवसात मराठा आरक्षण देतो अशी वल्गणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेच काय […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठीजे नेते येणार नाहीत, त्यांना निवडणुकीत पाडा; मनोज जरांगे

मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. याच अनुषंगाने आज धाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत राजकीय नेत्यांना इशारा दिला आहे. मुंबईत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात ९६ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया ११ जुलै रोजी

तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजता सोडत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मोठी आणि महत्त्वाची प्रक्रिया या आठवड्यात पार पडणार आहे. एकूण ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण शुक्रवारी, ११ जुलै २०२५ रोजी निश्चित करण्यात येणार आहे. ही आरक्षण प्रक्रिया अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास वर्ग (OBC) आणि महिला या प्रवर्गासाठी पार पडणार […]

अधिक वाचा..

जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल; हर्षवर्धन सपकाळ

परभणी: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेस ही यात्रा काढत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; कहीं खुशी, कहीं गम’

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवार (दि २३) रोजी मोठ्या उत्साहात आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत पार पडली. शिरुर तहसिल कार्यालयातील सभागृहात प्रांताधिकारी पुनम अहिरे व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत समीक्षा गिरमकर आणि वरद जाधव यांच्या हस्ते आरक्षण सोडतीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.   […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत २३ एप्रिल रोजी

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग व महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याच्या उद्देशाने आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही सोडत (दि. २३) एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता शिरूर तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृह क्रमांक १ येथे […]

अधिक वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका

एसटीची केलेली दरवाढ मागे घ्या, ही गरीब जनतेची लूट  नागपूर: एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे. गरीब, मजूर, महिला , कामगारांसाठी एसटी असताना त्यांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे एसटी दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. नागपूर इथे पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की एसटी मध्ये भ्रष्टाचार होत आहे, बस […]

अधिक वाचा..

मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा; नसीम खान

मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु नंतरच्या सरकारने हे आरक्षण कायम ठेवले नाही. हे आरक्षण धर्माच्या आधारित नाही, शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यासाठी हे आरक्षण देण्यात आले होते. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मागासलेपणानुसार मुस्लिम आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम […]

अधिक वाचा..