अहमदनगर- शिरुर बस प्रवासादरम्यान महीलेचे पाच लाख रुपये चोरटयाने लांबवले

शिरुर (तेजस फडके): अहमदनगर-पुणे असा एस टी बसचा प्रवास करत असताना शिरुर दरम्यान गाडी आलेली असताना उषाकिरण अशोक बाबळे (रा. अहमदनगर) या महिलेच्या मांडीवर ठेवलेल्या पिवशीतून तब्बल 5 लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. याबाबत सदर महीलेने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरटया विरोधात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि २५) […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंपनीत जाणाऱ्या कामगारांचे हातपाय बांधून लुटले…

रात्रीत दोन कामगारांना लुटल्याने कामगार भयभीत शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील कोरेगाव भीमा चौफुला रोडवरून रात्रीच्या सुमारास कंपनीत जाणाऱ्या कामगाराला मारहाण करत त्याचे हातपाय बांधून दुचाकी मोबाईल सह आदी वस्तू लुटून अजूनही एका कामगाराला मारहाण करत लुटल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाजेवाडी (ता. […]

अधिक वाचा..

दुकानदारांनो सावधान! दुकानदाराला बोलण्यात गुंतवुन चोरट्यांनी ३४ हजार रुपये केले लंपास

शिरूर तालुक्यात टोळी सक्रिय शिरुर (अरुणकुमार मोटे): वस्तू खरेदीच्या बहाण्याने अज्ञात व्यक्ती दुकानात गर्दी नसताना दुकानात येऊन बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दुकानाच्या गल्ल्यातील, ग्राहकांच्या खिशातील पैसे घेऊन जाणारी टोळी पुणे जिल्हयासह तालुक्यात, तालुक्यातील ग्रामीण भागात सक्रिय झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मलठण (ता. शिरूर) येथील अतुल यशवंत थोरात यांच्या गुरूदत्त किराणा दुकानामध्ये कोल्ड्रींक्स घेण्याच्या […]

अधिक वाचा..

पुणे नगर मार्गावर कोयत्याच्या धाकाने कुटुंबियांना लुटले

शिरुर नजीक न्हावरा फाटा येथील पहाटेची खळबळजनक घटना शिक्रापूर (शेरखान शेख): नजीक असलेल्या न्हावरा फाटा जवळ पुणे नगर महामार्गालगत असलेल्या नमो फर्निचर मॉल समोर पहाटेच्या सुमारास कोयत्याच्या धाकाने एका कुटुंबियांचे तीन लाखांचे सोन्याचे दागिने व काही रक्कम लुटल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर शहरातील पुणे […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात भंगार वाल्याला मारहाण करत लुटले

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील येथील एका भंगार व्यावसायिकास तीन अज्ञात युवकांनी मारहाण करत लुटून मारहाण करणाऱ्या युवकांनी त्यांची दुचाकी घटनास्थळी सोडून पलायन केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात 3 युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील भंगार व्यावसायिक रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुकानात झोपलेले असताना […]

अधिक वाचा..