शिरुर मध्ये भर दुपारी ६५ वर्षीय जेष्ठ महिलेला लुटले ९० हजारांचे मंगळसुत्र चोरीला

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील ओयासीस कॉलनीत रविवार दि ३ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास फुले तोडत असलेल्या ६५ वर्षीय छाया सातारकर यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. त्यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना समोर आली आहे.

हे दोन अज्ञात चोरटे हे युनिकॉर्न मोटारसायकल वर आले होते. चोरी केल्यानंतर ते तात्काळ पळून गेले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पुढील तपास करत आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, लवकरच आरोपींचा माग काढला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अशा चोरीच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना म्हणुन महिला व वयोवृद्धांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मौल्यवान दागिने घालणे टाळावे. तसेच संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन शिरुर पोलिसांनी केले आहे.

Video; रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन जवळच मध्यरात्री चोरीचा प्रयत्न

शिक्रापुर येथे फिल्मी स्टाईलने पाठलाग करत लिफ्टमध्ये जाणाऱ्या महिलेला लुटले

करडे येथील बाप-लेकीला अटक करण्यास पोलिसांकडुन टाळाटाळ की वरिष्ठ अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…?