शिरुर; मनरेगा विहिर गैरव्यवहार प्रकरणी बीडीओंनी दिला स्थळ पाहणीचा आदेश

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथील मनरेगा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीच्या कामावर गंभीर शंका उपस्थित होत असून, या पार्श्वभूमीवर शिरुर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ स्थळपाहणी करुन पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत मच्छिंद्र बापूराव पवार यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीत सुरेश विश्वनाथ देशमुख आणि प्रदीप सुरेश देशमुख […]

अधिक वाचा..

शिरुर; मनरेगा गैरव्यवहाराचा खोटा आरोप…? देशमुखांचा पवारांवर पलटवार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथे मनरेगा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा मच्छिंद्र बापूराव पवार यांनी आमच्यावर खोटारडा आरोप केला आहे. तसेच हे आरोप खोडसाळ आणि निराधार असुन त्यांनी दिशाभुल केली असल्याचे प्रदीप सुरेश देशमुख यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले. देशमुख म्हणाले, “गट नं. ६१७ ची मी स्वतःच्या खर्चाने मोजणी करून […]

अधिक वाचा..

शिरुर; रामलिंग येथे श्रीमंत सरदार घराण्यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराने महिलांचा गौरव

शिरुर (अरुणकुमार मोटे) नवरात्र म्हणजे फक्त देवीची पूजा नाही तर महिलांच्या सामर्थ्याचा गौरव करण्याची संधी आहे. स्व. गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच तसेच रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात अनोखी कामगिरी करणाऱ्या महिलांचा “नवदुर्गा पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला ऐतिहासिक छटा लाभली. सुभेदार तानाजी मालुसरे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात मनरेगा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; उपोषणाचा इशारा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथील मच्छिंद्र बापूराव पवार यांनी मनरेगा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच यांना लेखी निवेदन दिले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा उद्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी उपोषण करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे. नेमकं […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यात बिबट–मानव संघर्ष टाळण्यासाठी १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टीम

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील बिबट्याचा वावर असलेल्या संवेदनशील भागांमध्ये मानव–बिबट संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर एकूण १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI Based) अलर्ट सिस्टीम बसविण्यात आल्या आहेत. या प्रणालीत बिबट्याच्या शरीरावरील पॅटर्न ओळखला जातो आणि तो त्या मार्गावरुन गेल्यास त्वरित सायरन वाजतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना बिबट तेथे असल्याची कल्पना […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये महिलांसाठी डिजिटल आर्थिक साक्षरता मास्टर ट्रेनर प्रशिक्षण; ३० महिला बनल्या “ई-दोस्त”

शिरुर (तेजस फडके) ग्रामीण भागातील महिलांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करून आर्थिक स्वावलंबनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘आयटीसी मिशन सुनहरा कल आणि बायफ संस्था पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरुर येथे “डिजिटल आर्थिक साक्षरता मास्टर ट्रेनर प्रशिक्षण” यशस्वीपणे पार पडले. या प्रशिक्षणात विविध गावांमधील तब्बल ३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामुळे शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांच्या हातात डिजिटल तंत्रज्ञान […]

अधिक वाचा..

शिरुर; विद्युत वाहिनीवर बेकायदेशीर जाहिरात फलक; महावितरणची पोलिसांकडे तक्रार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथे थेट विद्युत वाहिनीवर चढून अज्ञात व्यक्तीने मुसळधार पाऊसात बेकायदेशीररीत्या जाहिरातीचे फलक लावल्याचा धक्कादायक प्रकार ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने उघडकीस आणला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) रांजणगाव पोलिसांकडे पत्र देत संबधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे. पिंपरी दुमाला येथे दि २२ सप्टेंबर २०२५ […]

अधिक वाचा..

पिंपरखेडमध्ये शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या समन्वयाने शेतरस्ता खुला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला होता. मात्र महसूलमंत्री व शासनाने शेतरस्ते खुले करण्याच्या मोहिमेसह शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या पुढाकारामुळे अखेर हा शेतरस्ता खुला झाला. विशेष म्हणजे, सुरुवातीला मोठा विरोध असतानाही कसलाही पोलिस बंदोबस्त नसताना समन्वय साधत तणाव कमी करुन प्रशासनाने व चळवळीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून तब्बल १६ लाख ३३ हजार रुपयांचा कॉपर ट्यूबचा साठा चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मोठ्या चोरीमुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत नामदेव महादु गाडेकर (वय ३७, रा. मराठानगर, केडगाव, जि. अहिल्यानगर) यांनी […]

अधिक वाचा..

कारेगावात “शिवतीर्थ प्रतिष्ठान” तर्फे भव्य सार्वजनिक नवरात्रोत्सव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२५’ यंदा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. “शिवतीर्थ प्रतिष्ठान” आयोजित या उत्सवाची सुरुवात सोमवार दि २२ सप्टेंबर २०२५ रोजी झाला असुन संपूर्ण आठवडाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी ग्रामस्थांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन देवीच्या […]

अधिक वाचा..