‘शिरुर-हवेली’ मधुन महाविकास आघाडीच्या वतीने अ‍ॅड अशोक पवार उद्या भरणार उमेदवारी अर्ज

शिरुर (तेजस फडके) शिरुर-हवेली मतदार संघातुन महायुतीकडुन कोण उमेदवार असणार हे अजुनही निश्चित झालेले नाही. महायुतीचा शिरुर-हवेलीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र महाविकास आघाडीकडुन शिरुर-हवेलीत आमदार अ‍ॅड अशोक पवार यांचं मात्र उद्या २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच निश्चित झालं असुन अर्ज भरण्यापुर्वीच अशोक पवार यांनी सगळीकडे प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसत आहे. उद्या […]

अधिक वाचा..

शिरुरच्या पुर्व भागात मुजोर वाळु माफियांचा हौदोस; गुनाट येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

शिंदोडी (तेजस फडके) शिरुरच्या पुर्व भागातील घोड धरणात गेल्या तीन महिन्यांपासुन प्रचंड मोठया प्रमाणात यांत्रिक बोटींच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा चालु असुन याबाबत व्हिडीओ करुन तो सोशल मिडियावर व्हायरल केल्याचा राग आल्याने वाळू माफियांनी गुनाट येथील शेतकरी भिवसेन कोळपे यांना फोनवर धमकी देत त्यांच्या शेतीतील मोटारीसह, बोअरवेल व केबलची तोडफोड करत लाखों रुपयांचे नुकसान केले […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर-आंबेगाव मतदार संघात दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडुन अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असुन त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांचे तगडे आव्हान असणार आहे. त्यातच शिरुर मतदार संघातील पाबळ, कान्हूरसह १२ गावचा पाणीप्रश्न पुन्हा पेटला असुन सन २००९ पासुन वळसे पाटील या भागातले आमदार […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती मध्ये जेव्हा सभा होईल तेव्हा अनेक बॉम्ब फोडणार संग्राम शेवाळे यांचा ‘वाल्या’ ला इशारा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शिरुर-आंबेगावचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या सानिध्यात आल्यानंतर मी ‘वाल्या’ चा वाल्मिकी झाल्याचे नुकतेच विधान केले होते. ते विधान त्यांच्या चांगलंच अंगलट आल्याची सध्या शिरुर-आंबेगाव मतदार संघातील ४२ गावात दबक्या आवाजात चर्चा सुरु असुन देवदत्त निकम यांच्यानंतर कारेगावचे सुपुत्र अ‍ॅड संग्राम शेवाळे […]

अधिक वाचा..

शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शिरुर-आंबेगावचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी भीमाशंकर सहकारी कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांच्या पत्नीच्या नावावर रांजणगाव गणपती येथे पाच एकर जमीन असल्याचा आरोप केला होता. तर त्या जमिनीची कागदपत्र पाचुंदकर यांनी १६ ऑक्टोबर पर्यंत काढुन ठेवावी मी ती जमीन त्यांच्या नावावर करतो असे प्रति आव्हान निकम […]

अधिक वाचा..

शिरुर; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार:- संगीता राजापूरकर

शिरुर (अरुणकुमार मोटे) १९८ शिरुर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असुन १५ ऑक्टोबर २०२४ पासुन आचारसंहिता चालु झाली आहे. निवडणुक काळामध्ये राजकीय पक्ष, नेते कार्यकर्ते यांनी आचारसंहितेचे कडेकोट पालन करावे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी संगीता राजापुरकर यांनी शिरुर येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.   त्यामुळे शिरुर-हवेली विधानसभेसाठी […]

अधिक वाचा..
mauli katke

शिरुर-हवेलीतुन ज्ञानेश्वर कटके प्रबळ दावेदार; महायुतीकडुन ज्ञानेश्वर कटके निवडणुकीच्या रिंगणात…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कांग्रेसकडे असल्याने या मतदारसंघातुन खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुक लढविणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र अजित पवार आपल्या बारामती मतदारसंघातूनच रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शिरुर-हवेलीत उमेदवार देताना इलेक्टीव्ह मेरीट पाहूनच उमेदवारी दिली जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केल्याने या मतदारसंघातून महायुतीकडून प्रबळ दावेदार असलेले […]

अधिक वाचा..

निमोणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद अखेर मिटला, सामंजस्याने ग्रामसभेत निर्णय

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावात अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याप्रकरणी ग्रामसेवक बाळासाहेब शेळके यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केल्याने दोन माजी सरपंचासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत निमोणे येथील हनुमान मंदिरात मंगळवार (दि १५) रोजी ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी सामंजस्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परवानगीच्या […]

अधिक वाचा..

शिरुर-हवेलीत कसा जमणार सत्तेचा खेळ…? आचारसंहिता जाहीर झाली तरीही महायुतीचा अजुनही नाही मेळ

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता आज (दि १५) रोजी जाहीर झाली. शिरुर-हवेली मतदार संघात महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अशोक पवार यांच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब झाले आहे. परंतु महायुतीच्या वतीने अजुनही अशोक पवार यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार हे निश्चित झालेले नसल्याने महायुतीतला सावळा गोंधळ चव्हाट्यावर […]

अधिक वाचा..

निमोणे येथे अनधिकृत पुतळा बसविल्याप्रकरणी २ माजी सरपंचांसह १५ जणांवर गुन्हा दाखल

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावात ग्रामपंचायत कार्यालयाकडुन कोणतीही परवानगी न घेता मुख्य चौकात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याने दोन माजी सरपंचासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन याबाबत ग्रामसेवक बाळासाहेब बबनराव शेळके (वय ५३) रा. आंबळे ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली […]

अधिक वाचा..