शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी सहयोग सोसायटीत दाखल

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतलेली सुनेत्रा पवार यांची आज दुपारी पवार परिवाराचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीसाठी आधी आमदार रोहित पवार पोहोचले होते. शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी भेट घेतल्यावर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. […]

अधिक वाचा..

कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विदीप जाधव कुटुंबियांना भावनिक सांत्वन

सातारा: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःच्या वैयक्तिक दुःखाला बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व […]

अधिक वाचा..

पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांवर 25 हजार कोटींच्या MSCB घोटाळ्याची सावली

सुनेत्रा पवारांवरील ED चौकशी अद्याप प्रलंबित मुंबई: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्याप्रकरणी कायदेशीर तपासाची टांगती तलवार अजूनही कायम आहे. तब्बल 25 हजार कोटींच्या या कथित घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ED) आपल्या आरोपपत्रात सुनेत्रा पवार यांचे नाव अजित पवार यांच्यासह नमूद केले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) […]

अधिक वाचा..

अजित पवारांनंतर सत्तासंतुलन ढासळलं; सुनेत्रा पवारांसमोर चार मोठी आव्हान

मुंबई: अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सत्तेचा समतोल पुन्हा स्थिर होण्यासाठी वेळ लागणार असतानाच, या परिस्थितीत महायुती सरकारने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेकडे उपमुख्यमंत्रीपद आलं आहे. हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी, सुनेत्रा […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवारांचा शपथविधी म्हणजे भाजपचा मोठा डाव! बच्चू कडूंचा खळबळजनक आरोप

लातूर: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. लातूर येथे प्रहारच्या जिल्हा परिषद उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतील तीन बड्या नेत्यांवर थेट हल्लाबोल केला. बच्चू कडू म्हणाले, “राष्ट्रवादीचे तीन बडे नेते जरी पक्षात असले, तरी ते […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या नेतृत्वात बदल! सुनेत्रा पवार बारामतीकडे रवाना, तो पर्यत मंत्रालयात न येण्याचा निर्णय

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण साक्षी ठरला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या पदावर सुनेत्रा अजितदादा पवार यांची वर्णी लागली असून, शनिवारी सायंकाळी राजभवनात अतिशय साध्या आणि गंभीर वातावरणात त्यांचा शपथविधी पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमावर दुःखाचे सावट होते. सुनेत्रा पवार यांनी अत्यंत गांभीर्याने पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या […]

अधिक वाचा..

दादांची कमी कधीच भरून निघणार नाही, पण सुनेत्रा वहिनींनी शिवधनुष्य उचलल; अमोल मिटकरी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीसह त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर एबीपी माझाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री! सुप्रिया सुळेंची एकवाकी प्रतिक्रिया म्हणाल्या…

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीसाठी त्या आज सकाळी मुंबईत दाखल झाल्या होत्या. या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट

“वहिनी सावध असा, झारीतील शुक्राचार्य ओळखा” असा सल्ला मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर […]

अधिक वाचा..

अजित पवारांनंतर सत्ता-संघर्ष टोकाला! सुनेत्रा पवारांची एंट्री पण अर्थखात्याला भाजपचा ‘नकार’

अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे? सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तबाची शक्यता, अर्थखात्यावर भाजपचा दावा मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जागा कोण घेणार आणि महत्त्वाचे अर्थखाते कुणाकडे जाणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या (शुक्रवारी) […]

अधिक वाचा..