dharmendra-deshmukh

काशीद समुद्रात बुडून मृत्युमुखी पावलेले मुख्याध्यापक देशमुख यांच्यावर आंबळे येथे अंत्यसंस्कार

शिरूर (अरुणकुमार मोटे) : रायगड जिल्ह्यातील काशीद येथील समुद्रात बुडून मृत्युमुखी पावलेले मुख्याध्यापक धर्मेंद्र शहाजी देशमुख (वय ५५) यांच्यावर शनिवारी (ता. २८) त्यांच्या शिरूर तालुक्यातील आंबळे-कळवंतवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशमुख यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. देशमुख हे हवेली तालुक्यातील पिसोळी येथील महात्मा जोतिबा फुले विद्यालयात मुख्याध्यापक […]

अधिक वाचा..
school-teacher

शिरूर तालुक्यातील शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील सोने सांगवी येथील अनिल शेळके या शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अनिल शेळके हा कारेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असून, तो शिरूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचा संचालक […]

अधिक वाचा..
ramdas-thite-award

प्राचार्य रामदास थिटे यांचा गुणवंत प्राचार्य पुरस्काराने सन्मान…

शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर ) येथील श्री. संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांना संस्था चालक शिक्षण मंडळ पुणे यांचे वतीने आदर्श गुणवंत प्राचार्य पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धी, ग्रामीण परिसरात मुलींसाठी शिक्षणाची विशेष सुविधा, समावेशित शिक्षण, अध्ययन-अध्यापनात माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, […]

अधिक वाचा..

शिक्षकदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांची शिक्षिकेला अनोखी भेट, शिक्षिकेला भेट म्हणुन दिली चक्क सोन्याची अंगठी

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका आशा गणेश पवार (शिंदे) यांना शिक्षकदिनी विद्यार्थ्यांनी चक्क सोन्याची आणि मानचिन्ह देवून सन्मानित केले आहे. पुर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (२०२३/२४) मध्ये या शिक्षिकेच्या इयत्ता पाचवीच्या वर्गातील राज्य गुणवत्ता यादीत दोन व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये सात असे एकूण ९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले होते.   […]

अधिक वाचा..

शिक्षकांच्या बदलीसाठी चक्क शाळा भरवली शिरूर पंचायत समितीत…

शिरूर (अरुणकुमार मोटे): आंबळे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दर्जाहीन शिक्षण दिले जात असल्याचा आरोप करीत आणि या शिक्षकांची बदली करून दुसरे शिक्षक द्यावेत, या मागणीसाठी आंबळे (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी सोमवारी (ता. ८) टोकाचे पाऊल उचलत गावातील शाळा बंद करून विद्यार्थ्यांना घेऊन थेट शिरूर पंचायत समितीच्या प्रांगणात शाळा भरवली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे […]

अधिक वाचा..
jagannath-kadam-sadalgaon

सादलगावमध्ये मुख्याध्यापक जगन्नाथ कदम यांचा नागरी सत्कार!

सादलगाव (संपत कारकूड): सादलगाव (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक जगन्नाथ बापूराव कदम यांच्या सेवापुर्तीनिमित्त शाळा व्यवस्थापन समिती, गावचे ग्रामस्थ आणि शाळेतील सर्व विध्यार्थी यांच्याकडून सपत्नीक भव्य नागरी सत्कार करण्यात आला. जगन्नाथ कदम हे ३० एप्रिल २०२४ रोजी निवृत्त होत असून जि. प. प्रा शाळा सादलगाव या ठिकाणी गेली सहा वर्षांपासून सादलगाव येथे […]

अधिक वाचा..
arrest

चित्रपटाच्या नावाखाली शिक्षकाची 23 लाख रुपयांची फसवणूक…

अहमदनगर: एकाने मुलीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या नावाखाली शिक्षकाची 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 23 लाखाच्या मोबदल्यात कार देण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीने एका तोतया आरटीओ अधिकार्याला सोबत घेऊन शिक्षकाच्या बोगस कागदपत्रांवर सह्या घेण्याचा प्रयत्न कोतवाली पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे. राजेश भगवान पवार (वय 33 रा. […]

अधिक वाचा..
santosh gawade

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी संतोष गावडे; नूतन कार्यकारिणी…

शिक्रापूर : शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी संतोष गावडे तर महिला शिक्षक आघाडीच्या अध्यक्षपदी नयना अरगडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग मंगल कार्यालय न्हावरा फाटा येथे पार पडलेल्या तालुका संघाच्या अधिवेशनात ही निवड करण्यात आली. यावेळी श्री संभाजीराव थोरात यांनी सांगितले की, […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण होईपर्यंत 50 टक्के शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू; दिपक केसरकर

मुंबई: शिक्षक भरतीबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली असून दोन टप्प्यांत शिक्षक भरतीप्रक्रिया सुरू असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले. ही प्रक्रिया थांबवलेली नसून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी तसेच जिल्हानिहाय बिंदू नामावलीचे काम पूर्ण होताच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. विधान परिषद सदस्य किरण सरनाईक यांनी यासंदर्भातील […]

अधिक वाचा..
jategaon school

शिरूर तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल स्थानी…

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि आठवीच्या (पूर्व माध्यमिक ) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. राज्यातील सर्वाधीक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यात शिरूर तालुका अव्वलस्थानी असल्याची माहिती शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. परीक्षा परिषदेने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १२ फेब्रुवारी २०२३ […]

अधिक वाचा..