santosh gawade

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी संतोष गावडे; नूतन कार्यकारिणी…

शिरूर तालुका

शिक्रापूर : शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी संतोष गावडे तर महिला शिक्षक आघाडीच्या अध्यक्षपदी नयना अरगडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग मंगल कार्यालय न्हावरा फाटा येथे पार पडलेल्या तालुका संघाच्या अधिवेशनात ही निवड करण्यात आली. यावेळी श्री संभाजीराव थोरात यांनी सांगितले की, ‘शिक्षकांच्या महत्वाच्या प्रश्नासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक झाली. जुनी पेन्शन योजना लागू करणे, विना अट घरभाडे भत्ता, कॅशलेस योजना, शिक्षकामधून केंद्रप्रमुख भरणे यासाठी 50 वर्ष वयाची अट रद्द करणे, 100%पदवीधरांना पदवीधर वेतनश्रेणी देणे, बारावी विज्ञान पदवीधरांना बीएस्सी करण्यास सवलत देणे असे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्रांनी दिले.

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी सांगितले की, ‘पुणे जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मुख्यकार्यकरी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याबरोबर बैठक घेऊन मार्गी लावू. यावेळी राष्ट्रीय शिक्षक संघाचे महासचिव बाळासाहेब झावरे, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप, जिल्हा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, सरचिटणीस खंडेराव ढोबळे, कार्याध्यक्ष पोपट निगडे, उपाध्यक्ष विकास शेलार शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस राजेश राऊत, रमेश मारणे, धनंजय जगताप, पुरंदर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष तानाजी फडतरे, जुन्नर शिक्षक पतसंस्था सभापती वैभव सदाकाळ, जुनी पेन्शन संघटनेचे शिरुर तालुका अध्यक्ष बबन म्हाळसकर, संतोष पानसरे, नवनाथ आडकर, विजय कोळपे आदी मान्यवर उपस्थित होते.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संतोष थोपटे यांनी केले. यावेळी जिल्हा संघाचे कोशाध्यक्ष माऊली पुंडे, कार्यकारी अध्यक्ष उत्तम भंडारे, विभागीय उपाध्यक्ष बापूसाहेब लांडगे, महिला आघाडी अध्यक्षा साधना शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शांताराम घोरपडे यांची म.रा.प्राथ शिक्षक संघाच्या सल्लागार पदी तर बाळासाहेब घोडे यांची राज्याचे संपर्कप्रमुखपदी निवड जाहीर करण्यात आली.

वाघाळे विकास सोसायटीच्या सभापती पदी सूर्यकांत बढे (प्राथमिक शिक्षक) यांची निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच परतालुका, परजिल्ह्यातून बदलीने शिरुर तालुक्यात नव्याने रुजू झालेल्या शिक्षक बांधवांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संघ सरचिटणीस कैलास पडवळ यांनी केले, तर आभार राज्य संघ उपाध्यक्ष सुरेश सातपुते यांनी मानले.

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष- संतोष गावडे
शिक्षक नेते- संतोष शेवाळे
सरचिटणीस- आप्पासाहेब रसाळ
कार्याध्यक्ष- राहुल घोडे
कोषाध्यक्ष- आबासाहेब जाधव
तालुका समन्वयक- रमेश उबाळे
संपर्कप्रमुख- हिरामण ढोकले
प्रसिद्धीप्रमुख- संतोष जाधव
प्रवक्ते- दत्ता घाडगे
कार्यालयीन चिटणीस- तानाजी पोखरकर
मिडिया प्रमुख- राजाराम सकट
मुख्यसंघटक- आशितोष खेडकर
विभागप्रमुख तळेगाव- सर्जेराव पाखरे
विभागप्रमुख पाबळ- रविंद्र खोसे
विभागप्रमुख-कवठे- बाबाजी हिलाळ
विभागप्रमुख सरदवाडी- संजय वाळके
विभागप्रमुख न्हावरे- नवनाथ काळे

महिला शिक्षक आघाडी कार्यकारिणी:
अध्यक्ष – नयना आरगडे
कार्यकारी अध्यक्ष – संगिता मंडले
शिक्षकनेत्या- मंगल घोरपडे
सरचिटणीस- सुनिता लंघे
कार्याध्यक्ष- मनिषा घावटे
कोषाध्यक्ष- जयमाला मिडगुले
तालुका समन्वयक- कुंदा निचित
संपर्कप्रमुख- सुमन भोगावडे
प्रसिद्धीप्रमुख- छाया गुंड
प्रवक्ते- सरीता शितोळे
कार्यालयीन चिटणीस- वैशाली थिटे
मिडिया प्रमुख- ज्योती गर्जे
मुख्यसंघटक- निलोफर तांबोळी
विभागप्रमुख तळेगाव- मनिषा भंडारे
विभागप्रमुख पाबळ- पल्लवी गायकवाड
विभागप्रमुख कवठे- ज्योती निचित
विभागप्रमुख सरदवाडी- नलिनी पाचार्णे
विभागप्रमुख न्हावरे- भारती भोसले