dharmendra-deshmukh

काशीद समुद्रात बुडून मृत्युमुखी पावलेले मुख्याध्यापक देशमुख यांच्यावर आंबळे येथे अंत्यसंस्कार

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे) : रायगड जिल्ह्यातील काशीद येथील समुद्रात बुडून मृत्युमुखी पावलेले मुख्याध्यापक धर्मेंद्र शहाजी देशमुख (वय ५५) यांच्यावर शनिवारी (ता. २८) त्यांच्या शिरूर तालुक्यातील आंबळे-कळवंतवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

देशमुख यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. देशमुख हे हवेली तालुक्यातील पिसोळी येथील महात्मा जोतिबा फुले विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून काम करीत होते. त्याचबरोबर शिक्षक संघटनेचे विश्वस्त, तसेच शिरूर तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. ते उत्कृष्ट क्रीडाशिक्षक म्हणून तालुक्यात परिचित होते.

अंत्यविधी साठी डी. सि. एम. सोसायटी पुणेचे जनरल सेक्रेटरी विशालभाऊ शेवाळे, मा. सभापती विश्वास आबा कोहकडे, आंबळे व कळवंत वाडी गावचे सर्व आजी, माजी सरपंच, सर्व आजी माजी चेअरमन, सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी, अनेक मुख्याध्यापक, शिक्षक व आंबळे आणि पंचक्रोशी तील ग्रामस्थ उपस्थित होते.

शिक्षकदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांची शिक्षिकेला अनोखी भेट, शिक्षिकेला भेट म्हणुन दिली चक्क सोन्याची अंगठी

शिरुर येथील ‘सेंट जोसेफ’ शाळेत डिजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत डान्स करणे शिक्षकांना भोवले; तब्बल १७ जणांवर गुन्हा दाखल

चित्रपटाच्या नावाखाली शिक्षकाची 23 लाख रुपयांची फसवणूक…

वढू बुद्रुकच्या शिक्षकाचा कारेगावमध्ये अपघाती मृत्यू

शिरूरच्या शिक्षक कुटुंबावर घाला; आई-वडिलांसोबतचा फोटो ठरला अखेरचा…

काशिद समुद्रात ६ जण बुडाले, चौघांना वाचवलं; एकाचा मृत्यू, १ बेपत्ता…