jagannath-kadam-sadalgaon

सादलगावमध्ये मुख्याध्यापक जगन्नाथ कदम यांचा नागरी सत्कार!

शिरूर तालुका

सादलगाव (संपत कारकूड): सादलगाव (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक जगन्नाथ बापूराव कदम यांच्या सेवापुर्तीनिमित्त शाळा व्यवस्थापन समिती, गावचे ग्रामस्थ आणि शाळेतील सर्व विध्यार्थी यांच्याकडून सपत्नीक भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

जगन्नाथ कदम हे ३० एप्रिल २०२४ रोजी निवृत्त होत असून जि. प. प्रा शाळा सादलगाव या ठिकाणी गेली सहा वर्षांपासून सादलगाव येथे कार्यरत आहेत. त्यांच्या काळात शाळेच्या नवीन वर्गखोल्यांची कामे, त्यांची रंगरंगोटी, शाळेचे कंपाउंड तसेच शाळेची मोठी भरभराट झालेली होती. विभागीय पातळीवर शाळेने विविध क्रीडा प्रकारामध्ये भाग घेऊन शाळेच्या नावलौकिकामधे भर टाकण्यात त्यांचा वाटा होता. यासर्व कामांची दखल घेऊन शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी शाळेतील विधार्थी सर्वानी मिळून आपले ऋण व्यक्त करण्यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. दरम्यान इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.

कार्यक्रमात शाळेतील शिक्षक-शिक्षिका, गावातील व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अलकाताई माने, सचिन शेळके, सदस्य राहुल केसवड, उद्धव साळुंके, कविता पवार, सारिका गायकवाड, विकास चव्हाण, माजी सदस्य संतोष केसवड, भरत होळकर तसेच संतोष माने, भाऊसाहेब गायकवाड, गावचे सरपंच अविनाश पवार, उपसरपंच अश्विनी केसवड, पोलीस पाटील दिव्या कारकुड-कोळी, महादेव होळकर, संतोष पवार, देविदास होळकर, खंडेराव मीठे, मनीषा गायकवाड यांच्यासह स्टाफ मंगल घोरपडे, रेश्मा जगताप, अतुल कांडगे व अन्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शब्बीर शेख तर आभार प्रदर्शन भागवत कारखिले यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात उपस्थितांना श्री. कदम यांच्याकडून स्नेह भोजन देण्यात आले.

शिरुर; निकृष्ट पोषण आहार पुरविणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा रामलिंग महिला उन्नतीची मागणी

शिरुर तालुक्यात सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी हैराण KYC अभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले