करंदीत बंद घराचे कुलूप तोडून चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका बंद घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व देवाच्या मूर्ती सह आदी साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील दिगंबर दरेकर हे व्यवसायाच्या निमित्ताने पुणे येथे राहण्यास असून 8 नोव्हेंबर रोजी दरेकर हे […]

अधिक वाचा..

सणसवाडीत चोरी करुन चार महिन्यांपासून फरार आरोपी अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील चौकातून चार महिन्यांपूर्वी 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरुन फरार झालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. सणसवाडी ता. शिरुर येथे बलेंदर यादव यांचे पानाचे दुकान असून २४ जुलै २०२२ रोजी सकाळच्या […]

अधिक वाचा..
crime

करंदीच्या जिल्हा परिषद शाळेतील साहित्यांची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्टोअर रूमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी शाळेतील साहित्यांची चोरी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गौतम गायकवाड हे सकाळच्या सुमारास शाळेत आल्यानंतर शाळेत फेरफटका मारत असताना त्यांना […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर गावचे हद्दीतील पाषाण मळा येथे पुणे ते नगर रोड बायपास येथील श्री शिवसाई फ्युल स्टेशन इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमीटेड कंपनीच्या पेट्रोलपंपामध्ये पहाटे अडीच ते पावने तीनच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून रुपये ४९, ४०० व विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेला आहे. याबाबत सविस्तर हकिगत अशी की, (दि. १2) रोजी […]

अधिक वाचा..

सणसवाडीतील कंपनीतून साडेसात लाखांचा ऐवज चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीतून खिडकीचे गज उचकटून कंपनीतील सेन्सर सह कॉपर धातूचे साहित्य असा तब्बल 7 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. येथील) कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय शेजारील व्हीक्टोरा प्रायवेट लिमिटेड कंपनीतील सर्व […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत मैत्रिणीनेच मारला सात लाखांच्या दागिन्यावर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे घरी आलेल्या मैत्रिणीने घरातील 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 7 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रतीक्षा अविनाश चौरे या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील प्रीती तळोले या महिलेचे सहा महिन्यापूर्वी […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील घरातून टीव्ही सह साहित्य चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या फार्म हाउसच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील साहित्य चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील चोवीसवा मैल येथे ओमप्रकाश जाधव यांनी फार्म हाउस बांधलेले असून ते पुणे येथे नोकरीला आहेत. मात्र […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात चोरट्यांचा मोर्चा आता शेतमालकडे, वखारीतून कांद्याची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथील घरफोडी, कृषी पंप चोरी, केबल चोरी तसेच कृषीची दुकाने फुटलेली असून या गुन्ह्यांचा तपास लागत नाही तोच आता टेमकर वस्ती येथील शेतकऱ्याच्या वखारीतून कांद्याची चोरी झाल्याने शेतकरी वर्गात असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. टेमकर वस्तीतील म्हसेफाटा येथे चारीच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरेश लोखंडे यांच्या वखारीतून रात्रीचे […]

अधिक वाचा..

दूध संघातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ…

जळगाव: दूध संघात अपहार नव्हे, तर चोरी झाली आहे. यामुळे तात्काळ गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. मात्र पोलीस अधिक्षकांवर सत्ताधार्‍यांचा दबाव असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. जळगाव जिल्हा दुध संघात झालेल्या चोरीप्रकरणी दुध संघाच्या कार्यकारी संचालकांनी तक्रार केली […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलीसांनी मोबाईल चोरी प्रकरणी टिकटॉक स्टारला ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): सोशल मिडीयावरती रिल्स व टिकटॉक व्हिडीओ बनविण्याचा छंद असल्याने एका युवकाला फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी चांगल्या दर्जाच्या मोबाईलची आवश्यकता होती. त्याचे इंन्टाग्राम अकाऊंटवरती वेगवेगळे व्हिडीओ, रिल्स असुन त्याचे 50,000 पेक्षा जास्त फॉलोर्स आहेत.त्यामुळे नवीन मोबाईल घेण्यासाठी त्याला आर्थिक अडचण असल्याने त्याने मोबाईल चोरी केली. पण पोलिसांनी CCTV फुटेज चेक केलं आणि […]

अधिक वाचा..