crime

शिरुर तालुक्यात चोरांनी गरीबाच्या झोपडीतून कशाची चोरी केली पहा…

शिरुर(अरुणकुमार मोटे): मोठमोठया अलिशान घरांमध्ये चोरी, दरोडा टाकल्याचे आपण नेहमी ऐकले असेल पण चोरांनी चोरी करण्याचा कळस केला असून अज्ञात चोरट्यांनी शिरुर तालुक्यातील आण्णापूर येथील कॉलनी फाटयावरील झोपडीतून ऊसतोड कामगारांनी झोपडीत ठेवलेले बाजरीचे दोन कट्टे व उसाचे वाढे विकून जमवलेले 4 हजार रुपये चोरुन नेले आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात या चोरांविषयी तीव्र भावना व्यक्त होत […]

अधिक वाचा..

शिरुरच्या श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेमध्ये लोखंडी स्टीलची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेमध्ये ४ अज्ञात चोरटयांनी बांधकामासाठी आणलेले लोखंडी पाईप सळईचे तुकडे चोरून नेले आहेत. शिरुर गावच्या हद्दीत असणाऱ्या या संस्थेच्या मालकीच्या सि टी बोरा कॉलेजच्या उघडयावरील ग्रांऊडवर ठेवलेले 10 -10 फुट स्टीलचे अंदाजे 400 किलो वजनाचे तसेच 10 हजार रुपये किंमतीचे 60 तुकडे 4 अज्ञात व्यक्तींनी चोरल्याची […]

अधिक वाचा..

जैन मंदिरातील सोन्याच्या मूर्तीची चोरी; 24 तासात लावला छडा…

औरंगाबाद: कचनेर येथील जैन मंदिरातून एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. औरंगाबादच्या कचनेर येथील जैन मंदिरातून एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. या घटनेनंतर संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे सोन्याच्या मूर्तीची चोरी करुन त्याजागी […]

अधिक वाचा..

चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने सतर्कता गरजेची

ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्रांना कार्यन्वित करण्याची आवश्यकता शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरातील आदी गावांमध्ये चोऱ्या, दरोड्यांची संख्या वाढू लागलेली असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान देखील होत असल्याने परिसरात पोलिसांनी ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्रांच्या मदतीने गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) जवळील अनेक गावांमध्ये मोबाईल व दुचाक्या […]

अधिक वाचा..

केंदुरमध्ये घराचा दरवाजा तोडून पावणे दोन लाखांची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील एका बंद घराच्या मुख्य दरवाजा सह सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी घरातील 1 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील सुक्रेवाडी येथे राहणारे किशोर राहणे हे […]

अधिक वाचा..
crime

दुचाकीवरील चोरटयाने हिसकावले महीलेच्या गळ्यातील गंठण अन…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरांनी हौदास घातला असून सिमा अमर ओहोळ (वय ३५) या महिलेच्या गळयातील सोन्याचा गंठण अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवर येवून हिसकावून नेला आहे. महीनाभरातील ही दुसरी घटना शिरुर शहरात घडली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि.२८) नोव्हेंबर रोजी सायंकाळी १४:३० वा.चे सुमारास मौजे शिरुर गावच्या हद्दीत विद्याधाम प्राथमिक […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातुन चोरट्यानी काय चोरले बघाच…

शिरुर (अरुणकुमार मोटे): पैसे कमविण्यासाठी चोरटे कशाची चोरी करेल याचा काही नेम नाही. सोन्या – नाण्याच्या मौल्यवान वस्तु ऐवजी चोर आता शेतकऱ्यांचे शेतमाल, कांदे, विद्युत मोटारी, जनावरे चोरीकडे वळाले आहे. आधीच तीन महीने जोरदार अतीवृष्टी, त्यात शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना चोरट्यांनी आता शेतकऱ्यांनाच आपले लक्ष केले आहे. अशीच एक घटना शिरुर […]

अधिक वाचा..
crime

जातेगाव खुर्द मधून चक्क कंटेनरची नवीन चाशी चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याचे नजीक असलेल्या पंजाबी ढाब्यासमोरुन एका नवीन कंटेनरची चाशी चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर चाकण रस्त्याने सरबजित सिंग यांच्या ट्रान्सपोर्टचा चालक साहिल लाहुरी हा त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीच्या कंटेनरची जे एच ०५ ए […]

अधिक वाचा..
crime

शिक्रापुरातून युवकाचा लॅपटॉप व मोबाईल लांबविला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका मुलाच्या घरातून अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा नजीक शिक्षक कॉलनी मध्ये सिद्धेश शामकुवर हा मित्रांसमवेत राहत आहे. सकाळच्या सुमारास सिध्देशचा एक मित्र रुम मध्ये झोपलेला असताना सिद्धेश त्याचा […]

अधिक वाचा..

वाजेवाडीत घराचा दरवाजा उचकटून चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी ता. शिरुर) येथील एका घरातील व्यक्ती बाहेर गेलेले असताना अज्ञात व्यक्तीने बंद घराचा दरवाजा उचकटून घरातील रोख रक्कम तसेच काही डायऱ्या चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाजेवाडी (ता. शिरुर) येथील मयूर लोखंडे यांची आई व बहिण काही कामाच्या निमित्ताने घराला […]

अधिक वाचा..