शिरुरमध्ये पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून मारहाण

क्राईम

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर गावचे हद्दीतील पाषाण मळा येथे पुणे ते नगर रोड बायपास येथील श्री शिवसाई फ्युल स्टेशन इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमीटेड कंपनीच्या पेट्रोलपंपामध्ये पहाटे अडीच ते पावने तीनच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून रुपये ४९, ४०० व विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेला आहे.

Ranjangaon marathon
Ranjangaon marathon

याबाबत सविस्तर हकिगत अशी की, (दि. १2) रोजी रात्री ०२.३० ते ०२.४५ वा .चे सुमारास मौजे शिरूर ता. शिरूर गावचे हद्दीत पाषाण मळा येथे पुणे ते नगर रोड बायपास येथील श्री शिवसाई फ्यूल स्टेशन इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमीटेड कंपनीचे पेट्रोल पंपामध्ये अंदाजे २५ ते ३० वर्षाच्या वयोगटातील अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळील हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकलवरुन पेट्रोल भरण्याचे बहाण्याने येवुन फिर्यादी शरद नानाकोल्हे व पेट्रोलपंपावरील कामगार विकास कुमार श्रीवास्तव यास शिवीगाळ, दमदाटी करुन कोयत्याचा धाक दाखवुन कोयत्याचे धार नसलेल्या बाजुने विकासकुमार यास मारहान करून त्याचेजवळील व ऑफीसचे काउंटरमधील अशी रोख रक्कम ४९, ४०० व विवो कंपनीचा मोबाईल असा एकुण किं. रु. ५४ , ४००रु. चा माल जबरीने चोरुन नेला आहे. शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटिल हे करत आहे.

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहीला असून चोरटयांनी धुमाकुळ घातला आहे. शिरुर शहरासह ग्रामीण भागात दुचाकी चोऱ्या, विद्युत मोटार चोऱ्या, दुकानांमध्ये चोऱ्या, व अनेक गंभीर गुन्हे वारंवार घडत असून याकडे वरीष्ठांनी लक्ष देणे गरजेचे असून नव्याने हजर झालेले पोलिस अधिक्षक अंकित गोयल शिरुरबाबत काय भुमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.